• Home
  • देश
  • युद्ध थांबणार कधी? दररोज अब्जावधींचा फटका सहन करतेय अमेरिका; आतापर्यंत एकूण नुकसान किती?
Top News

युद्ध थांबणार कधी? दररोज अब्जावधींचा फटका सहन करतेय अमेरिका; आतापर्यंत एकूण नुकसान किती?

US Iran Israel conflict

US Iran Israel conflict: अमेरिकासाठी इराण- इस्रायल संघर्ष दिवसेंदिवस अधिक खर्चिक ठरत आहे. या युद्धामुळे अमेरिकेच्या संरक्षण खर्चात प्रचंड वाढ झाली असून, दररोज अब्जावधी डॉलर्सचा बोजा तिजोरीवर पडत आहे. आतापर्यंतचा एकूण खर्चही चिंताजनक पातळीवर पोहोचला असून, या संघर्षाचा शेवट कधी होणार आणि अंतिम आर्थिक नुकसान किती वाढणार, याकडे जगाचे लक्ष लागेल आहे.

अमेरिकासाठी इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष आर्थिकदृष्ट्या मोठा ताण निर्माण करणारा ठरत असल्याची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. या संघर्षामुळे अमेरिकेच्या संरक्षण खर्चात झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा: एकनाथ शिंदे ॲक्शन मूडमध्ये! दोन मंत्र्यांची खुर्ची धोक्यात; लवकरच ‘नारळ’ देण्याची शक्यता

नुकताच इराणच्या ‘कॉस्ट टिकर’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेने आतापर्यंत सुमारे ३५ अब्ज डॉलर्स खर्च केल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांच्या कालावधीतच अब्जावधींचा खर्च वाढला असून, सरासरी दररोज जवळपास १ अब्ज डॉलर्स खर्च होत असल्याचे चित्र आहे.

लष्करी नुकसानही मोठे

या संघर्षात अमेरिकेच्या लष्करी साधनसंपत्तीचेही नुकसान झाले आहे. विविध अहवालांनुसार, नुकसानीचा आणि दुरुस्तीचा खर्च १.४ ते २.९ अब्ज डॉलर्स दरम्यान असू शकतो. स्वस्त ड्रोन हल्ल्यांमुळे महागड्या संरक्षण यंत्रणांना फटका बसल्याचेही समोर आले आहे.

काही प्रकरणांमध्ये चुकून स्वतःच्या कारवाईतच मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. महागडी लढाऊ विमाने, ड्रोन आणि इंधन वाहतूक करणाऱ्या यंत्रणांनाही फटका बसल्याची माहिती आहे.

ड्रोन आणि संरक्षण यंत्रणांवर परिणाम

या संघर्षात अनेक महागडे ड्रोन नष्ट झाल्याचे सांगितले जाते. तसेच रडार आणि क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींनाही मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

मानवी हानी आणि वाढता तणाव

संघर्षात काही अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला असून, अनेक जखमी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे लष्करी आणि मानवी दोन्ही स्तरांवर तणाव वाढताना दिसतो.

जागतिक परिणामही गंभीर

हा संघर्ष केवळ अमेरिकेपुरता मर्यादित नसून, त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवरही होत आहे. इंधन दरवाढ, वाहतूक अडथळे आणि व्यापारातील अनिश्चितता यामुळे अनेक देशांवर परिणाम जाणवत आहे.

मध्यपूर्वेत अमेरिकेने आपल्या सैनिकांची संख्या वाढवली असून, त्यामुळे संरक्षण खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, संघर्ष किती काळ चालणार आणि त्याचा अंतिम आर्थिक परिणाम किती मोठा असेल, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts