Car Wash Mistakes: अनेक लोक पैसे वाचवण्यासाठी घरच्या घरी कार धुणे पसंत करतात. जर तुम्हीही तसे करता, तर या महत्वाच्या गोष्टी जाणून घेणे खूप गरजेचे आहे.
आजकाल अनेकजण आपली कार स्वतःच घरच्या घरी धुतात. यामुळे पैसे आणि वेळेची बचत होते. पण जर कार योग्य पद्धतीने धुतली गेली नाही, तर यामागे कारला नुकसान होऊ शकते. लहान- मोठ्या चुका कारच्या पार्ट, काच आणि बॉडीवर परिणाम करू शकतात. जर तुम्ही घरच्या घरी कार धूत असाल, तर हे जाणून घेणे गरजेचे आहे की कोणत्या चुका तुमच्या गाडीचं नुकसान करू शकतात. आणि धुण्याची योग्य पद्धत काय आहे.
हेही वाचा: घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण! मुंबईत लवकरच म्हाडाची 2500 घरांची लॉटरी; जाणून घ्या संभाव्य किंमत
डिटर्जंट किंवा चुकीचा सॅम्पू
बरेच जण डिश वॉश लिक्विड, कपडे धुण्याचे डिटर्जंट किंवा घरगुती शॅम्पू वापरतात. हे पदार्थ कारच्या पेंटरसाठी योग्य नसतात आणि हळूहळू पेंटचा रंग बिघडवतात. याऐवजी कारसाठी बनवलेले खास वॉश शॅम्पू वापरा. हे पेंट सुरक्षित ठेवतात आणि कारला नेहमी चमकदार ठेवतात.
उन्हात कार धुणे टाळा
उन्हात कार धुणे म्हणजे मोठा धोका. पाणी लगेच सुकते आणि पाण्याचे डाग पडतात, त्यामुळे कारची चमक कमी होते. कार वॉश करण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी. किंवा सावलीत करा वॉश करा.
चुकीच्या कपड्यांचा वापर
जुने कपडे, टॉवेल किंवा टी-शर्ट वापरल्यास त्यातील धूळ कारच्या पेंटवर स्क्रॅच निर्माण करते. विशेषतः काळ्या रंगाच्या कारमध्ये हे लगेच दिसते.
सर्वोत्तम पर्याय म्हणजे मायक्रोफायबर कपडा किंवा स्पॉन्ज वापरणे, जे पेंट सुरक्षित ठेवते.
चुकीच्या पद्धतीने कार धुणे
नेहमी कारच्या खालील भागापासून सुरू करा, कारण तिथे जास्त गंदगी असते. नंतर वरच्या भाग आणि छत स्वच्छ करा. योग्य पद्धत पाळल्यास कारची शाईन कायम राहते आणि गंज किंवा डागांची शक्यता कमी होते.
घरगुती उपाय वापरणे टाळा
लिंबू, व्हिनेगर, बेकिंग सोडा किंवा इतर घरगुती उपाय वापरणे टाळा. हे पेंटवर खडबडीत डाग तयार करतात आणि मेटल भागावर गंज वाढवतात.












