• Home
  • लाईफस्टाईल
  • स्त्रियांच्या सौंदर्याचा वारसा! लाखाच्या बांगड्या कशा बनतात? जाणून घ्या त्यामागचा रंजक इतिहास
लाईफस्टाईल

स्त्रियांच्या सौंदर्याचा वारसा! लाखाच्या बांगड्या कशा बनतात? जाणून घ्या त्यामागचा रंजक इतिहास

Lac Bangale

Lac Bangles Making: लाखाच्या बांगड्या या स्त्रियांच्या सौंदर्याचा पारंपरिक भाग आहेत. त्या कशा तयार होतात आणि त्यामागचा इतिहास काय आहे, हे जाणून घेणे खूप रंजक आहे.

लाखाच्या बांगड्या या केवळ दागिना नसून स्त्रियांच्या सौंदर्याचा आणि परंपरेचा एक महत्वाचा भाग आहेत. आकर्षक रंग आणि पारंपरिक डिझाइनमुळे या बांगड्या आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. पण या सुंदर बांगड्या नेमक्या कशा तयार होतात आणि त्यामागचा इतिहास काय आहे, हे जाणून घेणे नक्कीच रंजक ठरेल.

हेही वाचा: मोठा अपडेट! रिक्षाचालकांना मराठी येणे बंधनकारक; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश

लाखाच्या बांगड्यांचा इतिहास

लाखाच्या बांगड्यांचा इतिहास खूप जुना आहे. पौराणिक ग्रंथांमध्येही लाखाचा उल्लेख आढळतो. महाभारतातील ‘लाक्षागृह’ या प्रसंगातून प्राचीन काळातही लाखाचा वापर होत असल्याचे दिसून येते. मुघल आणि राजपूत काळात या कलेचा अधिक विकास झाला. जयपूर आणि हैदराबादसारख्या ठिकाणी लाखाच्या बांगड्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती आणि वापर होत असे. परंपरेनुसार, विवाहित महिलांसाठी लाखाच्या बांगड्या सौभाग्याचे प्रतीक मानल्या जातात. विशेषतः राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये ही परंपरा आजही जपली जाते.

लाख म्हणजे नेमकं काय?

लाख हा एक नैसर्गिक राळ पदार्थ आहे, जो झाडांवर राहणाऱ्या केरिया लाका’ नावाच्या सूक्ष्म कीटकांपासून तयार होतो. या कीटकांमधून स्रवणारा चिकट पदार्थ गोळा करून त्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्यापासून विविध वस्तू तयार केल्या जातात. लाखाचा वापर बांगड्यांव्यतिरिक्त फर्निचर,पॉलिश, सौंदर्यप्रसाधने आणि औषधांमध्येही केला जातो.

लाखचयता बांगड्या कशा तयार होतात?

सर्वप्रथम कच्चा लाख आणि इतर घटक गरम करून वितळवले जाते.
त्यात विशेष पावडर मिसळून मिश्रण मजबूत केले जाते.
तयार मिश्रण लांब काठ्यांवर गुंडाळले जाते.
विविध रंगांची लाख गरम करून मुख्य मिश्रणावर चढवली जाते.
नंतर हे मिश्रण साच्यांमध्ये आकार देऊन बांगडीचा गोल आकार तयार केला जातो.
बांगडी गरम असतानाच त्यावर काच, मोती, कुंदन किंवा स्टोन बसवले जातात.
शेवटी बांगड्या थंड पाण्यात टाकून सुदृढ आणि चमकदार बनवल्या जातात.

आधुनिक डिझाइन आणि वैशिष्ट्ये

आज लाखाच्या बांगड्या लाल, हिरवा, गुलाबी आणि सोनेरी अशा विविध रंगांमध्ये उपलब्ध आहेत. आधुनिक काळात पेस्टल रंग आणि नवीन डिझाइन्सही वापरले जात आहेत. लाखाच्या बांगड्यांचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्या त्वचेसाठी सुरक्षित असतात आणि तुटल्यास पुन्हा गरम करून जोडता येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts