Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • भारताचा तिसरा सॅटेलाइट लॉन्च सेंटर? जाणून घ्या कुठे असेल हा स्पेसपोर्ट
Top News

भारताचा तिसरा सॅटेलाइट लॉन्च सेंटर? जाणून घ्या कुठे असेल हा स्पेसपोर्ट

space port

space port in gujrat : आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटानंतर (Sriharikota)  तमिळनाडूमध्ये (tamilnadu) आणखी एक सॅटेलाइट प्रक्षेपण केंद्र (Satellite Launch Center) उभारले जात आहे. तर भारताच्या तिसऱ्या उपग्रह प्रक्षेपण केंद्राबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. हे तिसरे सॅटेलाइट लॉन्च सेंटर गुजरातमधील गिर सोमनाथ (Gir Somnath) येथे स्थापन होणार असल्याची माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री अर्जुन मोढवाडिया (Minister of Science and Technology Arjun Modhwadia) यांनी विधान सभेत सांगितले.

हे ही वाचा: काय….भारत थांबवू शकते युद्ध; जागतिक नेत्यांचे कोणते आहे आकलन ?

श्रीहरिकोटा आणि थूथुकुडीनंतर आणखी एक स्पेसपोर्ट

श्रीहरिकोटा अंतरिक्ष केंद्र आणि तमिळनाडूच्या थूथुकुडी जिल्ह्यातील कुलसेकरपट्टिनम येथे प्रक्षेपण केंद्र उभारले जात आहे. त्यानंतर भारताचे तिसरे उपग्रह प्रक्षेपण केंद्र गुजरातमध्ये उभारले जाण्याची शक्यता आहे. अरब समुद्र किनाऱ्यालगत गिर सोमनाथ जिल्ह्याजवळ प्रस्तावित प्रक्षेपण स्थळाची ओळख पटली आहे.

लॉन्च पॅड विकसित करणार

भारतीय राष्ट्रीय अंतरिक्ष संवर्धन आणि प्राधिकरण केंद्र यांच्याशी सल्लामसलत करण्यात आली आहे. त्या ठिकाणची निवड करण्यात आली आहे. आमच्या विनंतीवरून IN-SPACe ने योग्य ठिकाण शोधले आहे, जे श्रीहरिकोटासारखे उपग्रह कक्षेत प्रक्षेपित करण्यासाठी लॉन्च पॅड म्हणून विकसित करता येईल. हे ठिकाण दीव आणि कोडिनार यांच्या दरम्यान असल्याचे अर्जुन मोढवाडिया म्हणाले.

साणंदजवळ 100 एकरांवर स्पेस पार्क

गुजरात सरकार अंतरिक्ष तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी साणंदजवळ (Sanand) 100 एकरांवर स्पेस पार्क उभारत आहे. अजिस्ता एरोस्पेसने (Agista Aerospace) 500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह लहान उपग्रहांचे उत्पादन सुरू केले असल्याचे मोढवाडिया यांनी सांगितले.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts