Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • पश्चिम आशियातील युद्धाचा इम्पॅक्ट औषधांवरही…!
Top News

पश्चिम आशियातील युद्धाचा इम्पॅक्ट औषधांवरही…!

medicine (1)

Impact of the War in West Asia on Medicines: पश्चिम आशियातील युद्धाचा मोठा इम्पॅक्ट (impact) समोर आला आहे. युद्धामुळे फार्मास्युटिकल पुरवठा (Pharmaceutical Supply) साखळी प्रभावित झाली आहे. त्यामुळे कच्च्या मालाच्या किमती केवळ पंधरा दिवसांत 200-300 टक्कयांपर्यंत वाढल्या आहेत. परिणामी औषधे महागणार (Medicines to become more expensive) असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे.

हे ही वाचा: लॉकडाऊनच्या अफवेवर केंद्र सरकार काय म्हणाले? मोठी अपडेट

हिमाचल प्रदेशात सुमारे 650 फार्मास्युटिकल युनिट्स

द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार, यामुळे औषध उत्पादक कंपन्या औषधांच्या किमती वाढवण्याचा इशारा देत आहेत. परिस्थिती कायम राहिल्यास पुरवठ्यात कमतरता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हिमाचल प्रदेशात सुमारे 650 फार्मास्युटिकल युनिट्स आहेत, जे देशभरात पुरवठा होणाऱ्या एकूण औषधांपैकी सुमारे 25 टक्के उत्पादन करतात.

आपत्कालीन टास्क फोर्स स्थापन करा

हिमाचल ड्रग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (Himachal Drug Manufacturers Association) ने केंद्र सरकारकडे उद्योग प्रतिनिधीं सोबत आपत्कालीन टास्क फोर्स स्थापन करण्याची आणि आवश्यक वस्तू कायदा, 1956 तातडीने लागू करण्याची मागणी केली आहे.

औषधांची टंचाई

द न्यू इंडियन एक्सप्रेसशी बोलताना HDMA चे प्रवक्ते संजय शर्मा (sanjay sharma)यांनी सांगितले की, जर पश्चिम आशियातील सध्याचा संघर्ष सुरू राहिला, तर कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे औषधांची टंचाई होणे निश्चित आहे. त्यांनी सांगितले की, सध्या पुरवठ्यात सुमारे 40 टक्के घट झाली आहे आणि कच्च्या मालाच्या किमती 150-200 टक्क्यापर्यंत वाढल्या आहेत.

रोजगारात कपात होण्याची शक्यता

मागील पंधरवड्यात केवळ पॅरासिटामोलची किंमत 250 रुपये प्रति किलोवरून 450 रुपये प्रति किलोपर्यंत वाढली आहे, कारण अनेक उत्पादकांकडे वाढलेल्या किमतींवर कच्चा माल खरेदी करण्याशिवाय पर्याय नाही. उत्पादन कमी झाले आहे कारण आता आमच्या युनिट्स 24 तासांऐवजी फक्त आठ तासांच्या शिफ्टमध्ये चालत आहेत.” त्यांनी यामुळे रोजगारात कपात होण्याची शक्यता देखील व्यक्त केली.

उत्पादन सातत्याने प्रभावित

रसायन व खत मंत्रालय आणि औषध विभागाला लिहिलेल्या पत्रात HDMA ने म्हटले आहे की अनियंत्रित किंमतवाढ आणि पुरवठा अडथळ्यांमुळे उत्पादन सातत्याने प्रभावित होत आहे.अहवालानुसार, सक्रिय फार्मास्युटिकल घटक (API), सॉल्व्हेंट्स, एक्सिपिएंट्स आणि पॅकेजिंग साहित्याच्या किमतींमध्ये अभूतपूर्व 200-300 टक्के वाढ झाल्यामुळे उत्पादन करार आता फायदेशीर राहिलेले नाहीत.

कामगारांच्या स्थलांतराची शक्यता

याशिवाय, घरगुती LPG च्या कमतरतेमुळे कामगारांच्या स्थलांतराची शक्यता आहे, ज्यामुळे पुढील काळात उत्पादन क्षमता आणखी कमी होऊ शकते आणि आवश्यक औषधांच्या पुरवठ्यावर धोका निर्माण होऊ शकतो.

औषधांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी कठोर पावले उचलावीत

पंजाब केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुरिंदर दुग्गल यांनी सांगितले की कच्चा माल, घटक, अॅल्युमिनियम फॉइल आणि इतर सॉल्व्हेंट्स यांच्या किमती वाढल्यामुळे येत्या काळात सर्व प्रकारच्या औषधांच्या किमती वाढणार आहेत. त्यांनी सांगितले की, सरकारने औषधांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी कठोर पावले उचलायला हवी होती. विशेषतः नियमित वापराच्या औषधांसाठी जसे की वेदनाशामक (पॅरासिटामोल) आणि मधुमेहाच्या औषधांसाठी.अमेरिका आणि युरोपीय देशांतून आयात होणाऱ्या कर्करोगाच्या औषधांच्या किमती देखील येत्या काळात वाढतील.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts