Dhurandhar The Revenge | दिग्दर्शक आदित्य धरचा (Aditya Dhar) ‘धुरंधर: द रिव्हेंज’ (Dhurandhar The Revenge) हा चित्रपट 19 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून सध्या तो चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट सुपरहिट ठरला असून बॉक्स ऑफिसवर (Box Office) या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. सध्या सगळीकडे या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. धुरंधर चित्रपटाच्या पार्ट 1 प्रमाणेच आता धुरंधर पार्ट 2 देखील प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे.
हेही वाचा – “तू सुंदर आहेस, पण तुझा नवरा…”, अशोक खरात महिलांना कसं ओढत होता आपल्या जाळ्यात? झाला धक्कादायक खुलासा
‘बाहुबली’ चित्रपटाच्या निर्मात्यानं केलं ‘धुरंधर 2’ चं कौतुक
धुरंधर 2 पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक एवढी गर्दी करत आहे की सिनेमागृह हाऊसफुल होताना दिसत आहे. तर धुरंधरच्या या यशस्वी कामगिरीचं कौतुक ‘बाहुबली’ चित्रपटाच्या निर्मात्यानं केलं आहे.
‘बाहुबली’ (Baahubali) चित्रपटाचे निर्माते शोबू यारलागड्डा यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “काल मी ‘धुरंधर द रिव्हेंज’ हा चित्रपट पाहिला. काही सांगायलाच नको इतका हा चित्रपट मला आवडला. या चित्रपटाचा आनंद मी पूरेपूर घेतला आहे. हा चित्रपट भारतात आणि जगभरात सर्व विक्रम मोडत आहे. तसेच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे हे पाहून खूप आनंद होत आहे. या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन”, असे शोबू यारलागड्डा यांनी म्हटलं आहे.
Yesterday I watched #Dhurandhar2TheRevenge and needless to say I loved it and thoroughly enjoyed the film! Happy to see it breaking all the records and setting new box office benchmarks in India and worldwide! Congratulations to the entire team! 👏🏼👏🏼 https://t.co/ATl3o3bNTu
— Shobu Yarlagadda (@Shobu_) March 28, 2026
शोबू यारलागड्डा यांच्या ‘बाहुबली 2’ चित्रपटाने उत्तर अमेरिकेतली सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांचा विक्रम मोडत 20 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली होती. तर धुरंधर 2 बाहुबलीचा हा मोठा विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे. धुरंधर 2 ने आत्तापर्यंत उत्तर अमेरिकेत 19.33 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे. त्यामुळे ‘धुरंधर 2’ लवकरच ‘बाहुबली 2’ चा विक्रम मोडत नवीन विक्रम प्रस्थापित करेल, असं म्हटलं जात आहे.
धुरंधर 2 ने आत्तापर्यंत 18,820 शोजमधून 62.85 कोटी रूपयांची कमाई केली आहे. त्यामुळे भारतातील चित्रपटांची एकूण कमाई 930.44 कोटी रूपये झाली आहे. तर या चित्रपटाने परदेशात 296.00 कोटी रूपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने भारतासोबत परदेशातही धुमाकूळ घातला आहे.












