• Home
  • राजकारण
  • ‘धुरंधर 2’मधील आर. माधवनच्या ‘त्या’ सीनवरून पेटला वाद; शिवसेना नेत्यांनी दिली आंदोलनाची चेतावणी
Top News

‘धुरंधर 2’मधील आर. माधवनच्या ‘त्या’ सीनवरून पेटला वाद; शिवसेना नेत्यांनी दिली आंदोलनाची चेतावणी

dhurandhar 2

Dhurandhar 2 | सध्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ (Dhurandhar The Revenge) हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. धुरंधर (Dhruandhar) चित्रपटाच्या पहिल्या पार्टप्रमाणेच आता धुरंधर: द रिव्हेंजलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. एकिकेड या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत असताना आता दुसरीकडे मात्र, या चित्रपटातील एका सीनवरून मोठा वाद पेटला आहे. आर.माधवनच्या (R.Madhavan) एका सीनवरून राजकीय वातावरण पेटले असून शिवसेनेच्या नेत्यांनी थेट आंदोलनाची चेतावणी दिली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – “लोकशाहीत गुंडागर्दी होणार असेल तर…”; सातारा प्रकरणावरून सुप्रिया सुळेंचे भाजपवर गंभीर आरोप; म्हणाल्या, पांडुरंगा…

‘धुरंधर: द रिव्हेंज’ मधील कोणत्या सीनवरून पेटला वाद?

आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर: द रिव्हेंज चित्रपटात गुरबानीचा अपमान करण्याता आल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेना नेते गुरजोत सिंह कीर यांनी या सीनवरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर याप्रकरणी चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी सार्वजनिक माफी मागावी, अशा मागणी गुरजोत सिंह कीर यांनी केली आहे.

हा वाद चित्रपटातील त्या सीनवरून होत आहे ज्यामध्ये अभिनेता आर.माधवन जो अजय सन्याल यांच्या भूमिकेत असतो, तर या भूमिकेतून तो गुरबानीचा उल्लेख करताना दिसत आहे. गुरबानीचा उच्चार करताना त्याच्या हातामध्ये सिगारेट दाखवण्यात आली आहे. त्यामुळे असं दाखवणं हे धार्मिक मर्यादेविरूद्ध असल्याचा आरोप गुरजोत सिंह कीर यांनी केला आहे. तसेच या सीनवरून शीख समुदायाच्या भावाना दुखावल्याचंही म्हटलं जात आहे.

धुरंधर: द रिव्हेंजमधील वादग्रस्त दृश्य काढून टाकण्याची मागणी

गुरजोत सिंह कीर यांनी सोशल मीडियावर धुरंधर: द रिव्हेंज मधील तो सीन पोस्ट केला आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी म्हटलं आहे की, मी धुरंधर: द रिव्हेंज चित्रपटाच्या निर्मात्यांना ते वादग्रस्त दृश्य काढून टाकण्याची मागणी करत आहे. तसेच त्यांनी तात्काळ माफी मागावी, जर त्यांनी तात्काळ कारवाई केली नाही तर या मुद्द्यावरून आंदोलन पेटवू, असा थेट इशारा गुरजोत सिंह कीर यांनी दिला आहे.

गुरबानी हा शीख धर्मियांचा पवित्र ग्रंथ असून त्याचं अशाप्रकारे चित्रिकरण करणं कोणत्याही परिस्थितीमध्ये समर्थन करण्यासारखं नाहीये. तसेच जेव्हा धार्मिक भावनांशी संबंधित बाबींमध्ये जेव्हा एखाद्या समाजाच्या श्रद्धेचा प्रश्न येतो तेव्हा संवेदनशील राहणं महत्त्वाचं असतं, असंही गुरजोत कीर यांनी म्हटलं आहे.

याप्रकरणी आता पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या चित्रपटातील संबंधित व्यक्तींनी माफी मागावी, अशी मागणी शीख समुदायाकडून आणि नेत्यांकडून करण्यात आली आहे. तर या प्रकरणावरून दिग्दर्शक आदित्य धर आणि अभिनेता आर.माधवनने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

दरम्यान, 19 मार्च रोजी ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असून या चित्रपटाने फक्त 5 दिवसांमध्ये 500 कोटी रूपयांचा टप्पा पार केला आहे. हा चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला असून याने अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. या चित्रपटात रणवीर सिंह, सारा अर्जुन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर.माधवन, राकेश बेदी यांच्यासह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts