Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • Dhurandhar 2: रणवीर सिंहच्या ‘धुरंधर 2’ ने रिलीज होण्यापूर्वीच धुमाकूळ; ओपनिंगला 200 कोटींच्या कमाईची शक्यता
मनोरंजन

Dhurandhar 2: रणवीर सिंहच्या ‘धुरंधर 2’ ने रिलीज होण्यापूर्वीच धुमाकूळ; ओपनिंगला 200 कोटींच्या कमाईची शक्यता

Dhurandhar 2 movie

Dhurandhar 2 Release Date: आगामी चित्रपट ‘धुरंधर 2’ रिलीज होण्याआधीच सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. पेड प्रिव्ह्यू शोसाठी तिकीट विक्री 32 कोटींपर्यंत पोहोचली असून, ओपनिंगला 200 कोटींच्या कमाईची शक्यता आहे.

रणवीर सिंहची आगामी चित्रपट धुरंधर 2: द रिवेंज’ साठी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता दिसत आहे. १९ मार्च रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून त्याआधी 18 मार्चपासून पेड प्रिव्ह्यू शो आयोजित करण्यात आले आहेत. या प्रिव्ह्यू शोसाठी आतापर्यंत सुमारे 5.44 लाख तिकीटांची विक्री झाली आहे. सध्या ट्रेंडनुसार, चित्रपट ओपनिंग डेला जगभरात २०० कोटी रुपयांच्या आसपास कमाई होण्याची शकता आहे. असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेहि वाचा: अरे बापरे! सलमान खानच्या गाण्यावर ऐश्वर्या-अभिषेक बच्चनचा भन्नाट डान्स; नेटकरी व्हिडिओ पाहून म्हणाले…

बुकिंग सुरू

सुरुवातीला केवळ १८ मार्चच्या पेड प्रिव्ह्यू शोसाठीच तिकिटांची अॅडव्हान्स बुकिंग उपलब्ध होती. मात्र आता १४ मार्चपासून ओपनिंग डे म्हणजे 19 मार्च तसेच पहिल्या वीकेंडपर्यंतच्या सर्व शोसाठी प्री-बुकिंग सुरू करण्यात आले आहे. देशातील अनेक शहरांमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. मुंबई, हैदराबाद आणि बेंगळुरू यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रीमियर शोच्या तिकीटांसाठी प्रचंड मागणी दिसत असून अनेक ठिकाणी सीट्स आधीच भरल्या आहेत.

पेड प्रिव्ह्यूमधून मोठ्या कमाईची शक्यता

ट्रेड तज्ज्ञांच्या मते, पेड प्रिव्ह्यू शोमधूनच चित्रपट 35 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करू शकतो. सध्याच्या अॅडव्हान्स बुकिंगच्या आकडेवारीनुसार, हा चित्रपट रिलीजपूर्वीच मोठा रेकॉर्ड करण्याच्या मार्गावर आहे.

चित्रपटाची माहिती

चित्रपट: धुरंधर 2: द रिवेंज
दिग्दर्शक: आदित्य धर
रिलीज तारीख: 19 मार्च 2026
पेड प्रिव्ह्यू: 18 मार्च
बजेट अंदाजे 225 कोटी रुपये
कालावधी: 3 तास 55 मिनिटे
कलाकार: रणवीर सिंह, अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन, सारा अर्जुन, राकेश बेदी, मानव गोहिल, गौरव गेरा, राज जुत्शी, सौम्या टंडन, अक्षय खन्ना (फ्लॅशबॅक), यामी गौतम (कॅमिओ)

तिकीटांचे दर कमी

चित्रपटाच्या प्रिव्ह्यू शोसाठी सुरुवातीला तिकीटांचे दर 400 ते 450 इतके ठेवले होते. मात्र प्रेक्षकांना अधिक संधी मिळावी यासाठी मल्टिप्लेक्समध्ये हे दर कमी करून सुमारे 300 करण्यात आले आहेत.

अॅडव्हान्स बुकिंगमध्ये विक्रम

अहवालानुसार, देशभरात 9500 पेक्षा जास्त पेड प्रिव्ह्यू शो आयोजित केले जात आहेत. शनिवारपर्यंत 5,44,237 तिकीटांची विक्री झाली असून त्यातून 27.36 कोटींची ग्रॉस कमाई झाली आहे. ब्लॉक सीट्सचा समावेश केल्यास ही रक्कम 32 कोटींपेक्षा जास्त होते. याआधी पेड प्रिव्ह्यू कमाईचा विक्रम पवन कल्याणच्या ‘दे कॉल हिम ओजी’ या चित्रपटाच्या नावावर होता. मात्र ‘धुरंधर 2’ ने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच हा विक्रम मोडला आहे.

परदेशातही मोठी क्रेझ

उत्तर अमेरिकेतही चित्रपटासाठी मोठी उत्सुकता दिसून येत आहे. प्रीमियर शोसाठी तेथे आतापर्यंत सुमारे $982,000 (₹9 कोटींपेक्षा जास्त) अॅडव्हान्स बुकिंग झाली आहे. कॅनडासह एकत्रित आकडा $1.2 मिलियन (सुमारे ₹11 कोटी) पार गेला आहे.

ओपनिंग डे ला ऐतिहासिक कमाईची शक्यता

भारतातच ओपनिंग डे ला 100 कोटींपेक्षा जास्त कलेक्शन होण्याची शक्यता आहे. परदेशातील कमाई जोडल्यास हा आकडा 200 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तसे झाले तर हा भारतीय चित्रपटसृष्टीतील एक मोठा विक्रम ठरू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts