• Home
  • देश
  • भारताकडे येणाऱ्या इराणच्या विमानावर अमेरिकेचा मोठा हल्ला, भीषण स्फोटाने जग हादरलं
Top News

भारताकडे येणाऱ्या इराणच्या विमानावर अमेरिकेचा मोठा हल्ला, भीषण स्फोटाने जग हादरलं

iran plane
89

US-Iran War | मागील काही दिवसांपासून अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये जोरदार युद्ध (War) सुरू आहे. या युद्धामुळे तिन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशातच आता संपूर्ण जगाला हादरवणारी बातमी समोर आली आहे. अमेरिकेने इराणवर मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – नितीश कुमारांनी दिला विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा; मुख्यमंत्रीपदावर प्रश्नचिन्ह? राजकीय गणितं बदलणार?

अमेरिकेचा पुन्हा इराणवर भीषण हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, इराणमधील मशहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकेने मोठा हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यादरम्यान विमानतळावर एक विमान उभे होते. तर अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यात विमानतळाचं आणि विमानाचं मोठं नुकसान झालं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात महान एअर या कंपनीच्या एका नागरी विमानाचे मोठे नुकसान झाले आहे. हे विमान भारतात येणार होते. युद्धग्रस्तांसाठी काही सामग्री नेण्यासाठी इराणचे हे विमान दिल्लीला येणार होते. या विमानातून युद्धग्रस्तांसाठी 11 टनांहून अधिक औषधे नेली जाणार होती, अशी माहिती समोर आली आहे.

इराणने दिलेल्या माहितीनुसार, महान एअर या कंपनीचे हे विमान दिल्लीतून मानवीय मदत घेऊन इराणला परत येणार होते. मात्र, हे विमान भारतात पोहोचण्याआधीच अमेरिकेने त्यावर हल्ला करून ते नष्ट केले. त्यामुळे या हल्ल्याला इराणने मदत आणि मानवी सहाय्यावर हल्ला केल्याचं म्हटलं आहे. या हल्ल्यानंतर इराण आता दुसरे विमान मदत आणण्यासाठी भारतात पाठवले जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान,  इराणने मित्र देशांच्या जहाजांना सूट देत बाकी देशांच्या जहाजांसाठी होर्मुझ सामुद्रधुनीचा (Hormuz Strait) मार्ग बंद केला आहे. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केल्याने संपूर्ण जगभरात एकच खळबळ उडाली आहे. इराणने सन्मान दाखवत अमेरिकेसाठी होर्मुझ सामुद्रधुनीतून 20 मोठी तेलवाहू जहाजे पाठवली आहेत. यासाठीची प्रक्रिया उद्यापासून सुरू होईल आणि पुढील काही दिवस चालेल. सुरूवातीला इराण देश 10 जहाजे पाठवणार होता मात्र आता त्यांनीच जहाजांच्या संख्येत वाढ केली आहे”, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

आम्ही इराणची अनेक महत्त्वाची ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत. आम्ही केलेल्या हल्ल्यामुळे इराणचे नौदल आणि हवाईदल जवळपास नष्ट झाले आहे. तसेच सध्या आम्ही इराणशी बोलत आहोत, सोबतच गरजेप्रमाणे हल्लाही करत आहोत, असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. त्यात आता अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यामुळे हे युद्ध आणखी पेटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts