Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • ऑफिस की गुप्त अड्डा? साऊंडप्रूफ काच, काळे पेढे, काळी फळे अन्…, अशोक खरातच्या ऑफिसमध्ये आढळल्या धक्कादायक गोष्टी
Top News

ऑफिस की गुप्त अड्डा? साऊंडप्रूफ काच, काळे पेढे, काळी फळे अन्…, अशोक खरातच्या ऑफिसमध्ये आढळल्या धक्कादायक गोष्टी

Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) ढोंगीबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. अशोक खरातने अनेक महिलांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबत, उद्योगपतींसोबत चांगले संबंध होते. त्याला भेटण्यासाठी अनेक राजकीय नेते येत होते. यामध्ये रूपाली चाकणकर, दीपक केसरकर, सुनील तटकरे, एकनाथ शिंदे, नीलम गोऱ्हे अशा अनेक नेत्यांची नावे समोर येत आहेत. तर ढोंगी अशोक खरातचा खरा चेहरा आता समोर आला असून नाशिक पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

हेही वाचा – राजकारणात खळबळ! झिरवळांच्या व्हायरल व्हिडीओप्रकरणी पहिला FIR दाखल, थेट कारवाई कुणावर?

अशोक खरातच्या कार्यालयात कोणत्या वस्तू सापडल्या?

अशोक खरातला अटक केल्यानंतर या प्रकरणाचा तपास नाशिक पोलीस आणि विशष तपास पथक करत आहे. विशेष तपास पथकाकडून या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे. सध्या एसआयटीने अशोक खरातच्या कार्यालयावर छापा टाकला आहे. तर या तपासात एसआयटीला खरातच्या कार्यालयात अनेक धक्कादायक गोष्टी सापडल्या आहेत.

उद्या (1 एप्रिल) अशोक खरातला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यापूर्वी विशेष तपास पथकानं खरातच्या कार्यालयावर धाड टाकली. या तपासात अनेक पुरावे एसआयटीच्या हाती लागले आहेत. खरातच्या कार्यालयात एक वही, काळे पेढे, काळी फळे आणि संशयास्पद काही यंत्रही सापडली आहेत. तसेच एसआयटीने तापासाचा भाग म्हणून पीडित महिलेला घटनास्थळी नेऊन क्राइम सीन रीक्रिशएन केला होता, अशी माहिती समोर आली आहे.

ज्या कार्यालयात अशोक खरात महिलांना भूल घालत त्यांचे लैंगिक शोषण करायचा त्या कार्यालयाची कसून तपासणी करण्यात आली. या तपासादरम्यान खरातन कार्यालयाला साऊंडप्रूफ काच आणि दरवाजे लावल्याचं समोर आलं आहे. त्याच्या केबिनमधील आवाज बाहेर जात होता का? आणि त्याच्या केबिनमधील सर्व गोष्टी बाहेरच्यांना दिसत होत्या का? याबाबतही पोलिसांनी शोध घेतला आहे.

दरम्यान, मागील 2 आठवड्यांपासून एसआयटीकडून आणि नाशिक पोलिसांकडून अशोक खरात प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. या तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. यामध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार, लोकांची आर्थिक फसवणूक, लुबाडलेल्या जमीन जुमला अशा अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts