Saptashrungi gad devotees : नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी विविध भागांतून भाविक गडावर दाखल होत आहेत. देवीच्या दर्शनासाठी भक्तांमध्ये मोठा उत्साह असून, गड परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. अनेक भाविक कुटुंबासह गडावर येऊन देवीचे दर्शन घेत आहेत, तर काही भक्त नवस फेडण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवीच्या चरणी प्रार्थना करत आहेत.
उत्तर महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वणी येथील श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. नवरात्रोत्सवातील सातव्या माळेनिमित्त शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गडावर मोठ्या संख्येने हजेरी लावली. सलग सुट्ट्या आणि नवरात्रोत्सवातील विशेष तिथी यामुळे गडावर भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. देवीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे.
सप्तमीच्या दिवशी दर्शनासाठी भाविकांचा ओघ
वणी च्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी ( several places) महाराष्ट्राच्या विविध भागांतून भाविक गडावर दाखल होत आहेत. कुटुंबीयांसह आलेले भक्त देवीचे दर्शन (devi darshan) घेऊन नवस फेडत आहेत. नवरात्रोत्सवाच्या प्रत्येक माळेला भाविकांची गर्दी वाढत असून, वणीच्या गडावरील देवीचे आणि आजूबाजूचे मनमोहक वातावरण अनुभवण्यासाठी आणि देवीला भेटण्यासाठी महाराष्टासोबतच देशाच्या विविध भागातून नागरिक येतात. णवत्रीच्या काळात देवीच्या आजूबाजूचा परिसर हा भक्तिभावाने उजळलेला पाहायला मिळतो . सप्तमीच्या दिवशी दर्शनासाठी मोठा ओघ पाहायला मिळाला. सप्तशृंगी देवीचे मंदिर हे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या काळात या ठिकाणी विशेष धार्मिक महत्त्व असते. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमुळे गडावरील वातावरण भक्तिमय झाले आहे.
भाविकांच्या सुविधांसाठी प्रशासन सज्ज (devotees)
नवरात्रोत्सवातील गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांकडून भाविकांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गर्दीचे नियोजनासाठी बेरीगेट्स, पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही यंत्रणेची मदत घेतली जात आहे. गडावरील घाटमार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये आणि भाविकांची सुरक्षितता राखली जावी, यासाठी नांदुरी येथून एसटी बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवाच्या नियोजित गर्दीच्या काळात खासगी वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे गडावर जाण्यापूर्वी भाविकांनी स्थानिक प्रशासनाच्या ताज्या सूचनांची माहिती घेणे आवश्यक आहे.
भक्तांच्या गर्दीने गडावर उत्साहाचे वातावरण (devotional)
नवरात्रोत्सव हा देवीच्या उपासनेचा आणि श्रद्धेचा महत्त्वाचा काळ मानला जातो. या काळात सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. देवीचे दर्शन घेण्यासाठी भक्त लांबचा प्रवास करून गडावर पोहोचत आहेत. दरम्यान, गर्दीच्या काळात भाविकांनी रांगेतून दर्शन घ्यावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि प्रवासादरम्यान आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.









