Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • खरातचे प्रस्त वाढवण्यासाठी रूपाली चाकणकर…, सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप, थेट एसआयटीला विचारला जाब
Top News

खरातचे प्रस्त वाढवण्यासाठी रूपाली चाकणकर…, सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप, थेट एसआयटीला विचारला जाब

Sushma Andhare On Rupali Chakankar | नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. तर या प्रकरणात आता रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचंही नाव घेतलं जात आहे. या प्रकरणामुळे रूपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच चाकणकर या खरातच्या शेजारी छत्री घेऊन उभ्या असलेला एक फोटो व्हायरल झाला होता. तर त्या खरातचे पाय धुतानाचेही फोटो व्हायरल झाले होते. यावरून चाकणकर आणि खरात यांच्या कुटुंबाचे जवळचे संबंध असल्याचं म्हटलं जात आहे. तर खरात प्रकरणी चाकणकरांवर राजकीय वर्तुळातून गंभीर आरोप केले जात आहेत.

हेही वाचा – बीडमध्ये क्रूरतेची परिसीमा! प्रेम प्रकरणातून तरुणावर अत्याचार; आधी त्याला झाडलं बांधलं अन् नंतर…

सुषमा अंधारेंनी नेमके काय आरोप केले?

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुषमा अंधारे म्हणाल्या की, अशोक खरातच्या मुलीला 33 लाखांचा फ्लॅट गिफ्ट करण्यात आला आहे. याबाबतचे सर्व धागेदोरे तुम्हाला सांगोल्यात सापडतील. या फ्लॅटच्या पुजेला सांगोल्यात खरात आणि बाकी सर्व मंडळी गेली होती. ललित पोकळेने ही पूजा केली होती. या पूजेला रूपाली चाकणकर देखील होत्या, असा खुलासा सुषमा अंधारेंनी केला आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, अशोक खरातचा भोंदूपणा आणि त्याचे प्रस्त वाढवण्यासाठी अनेक लोकं जाणिवपूर्वक मदत करत होते. खरातला कसल्याही प्रकारची सिद्धी प्राप्त झालेली नाहीये तरीही त्याचं प्रस्त वाढवण्याचा प्रयत्न केला जात होता. रूपाली चाकणकरही त्याचं प्रस्त वाढवण्यासाठी प्रयत्न करत होत्या. त्यामुळे ही माणसं गुन्हेगार आहेत, असा आरोप सुषमा अंधारेंनी केला.

चाकणकरांनी खरातच्या संदर्भात एक पत्र अधिक्षकांना द्यायला हवं होतं. मला खरातबाबत माहिती मिळाली असून त्याची चौकशी करा. खरात महिलांचे लैंगिक शोषण करतो का? याबाबत त्याची चौकशी व्हायला हवी, असं पत्र रूपाली चाकणकरांनी पोलिसांना आधीच का नाही दिलं? जेव्हा हे सर्व घडत होतं. असा प्रश्न सुषमा अंधारेंनी विचारला

रूपाली चाकणकरांना सगळी परिस्थिती माहिती होती तरीही त्यांनी गुन्हेगाराला पाठिशी घातले. एवढा सर्व खुलासा झाला असताना देखील मल प्रश्न पडतो की, चाकणकरांना एसआयटीने अजूनही चौकशीला का नाही बोलवले? असा सवालही सुषमा अंधारेंनी उपस्थित केला आहे. तर अंधारेंनी केलेल्या या आरोपांनंतर राज्यात एकच खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts