Mathadi Inspector Exam 2026 : महाराष्ट्राला पेपरफुटी आणि परीक्षा घोटाळाचं ग्रहण लागलंय… नीट पेपरलिक, टीईटी घोटाळा, आरोग्य विभाग भरती परीक्षा घोटाळा, म्हाडा भरतीतील पेपरफुटी, आणि एमपीएससीच्या MPSCऔषध निरीक्षक परीक्षेचा वाद अजून शमलाही नव्हता, तोच महाराष्ट्रातील स्पर्धा विश्वाला हादरवून टाकणारा एक नवीन आणि धक्कादायक घोटाळा समोर आला आहे, हा घोटाळा आहे, कामगार आयुक्तालयाची माथाडी कामगार निरीक्षक भरती परीक्षा २०२६ या परीक्षेतला…. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन एक धक्कादायक खुलासा केला आहे, माथाडी कामगार निरीक्षक परीक्षेच्या पेपरमध्ये घोळ झाल्याचा आरोप त्यांनी पुराव्यासकट केला आहे.
माथाडी भरती परीक्षेत नेमका काय वाद? ( Mathadi Inspector Exam 2026 )
सुषमा अंधारेंनी ( Sushma Andhare ) आणलेले पुरावे काय सांगतात? कामगार आयुक्तालयाने माथाडी निरीक्षकांच्या एकूण ६२ जागांसाठी ही परीक्षा घेतली होती, राज्यभरातून हजारो विद्यार्थी या परीक्षेला बसले होते, पण जेव्हा निकाल जाहीर झाला, निकालाच्या गुणवत्ता यादीवर नजर टाकली तर, पहिल्या २७ टॉपर्स पैकी तब्बल १५ पेक्षा जास्त उमेदवार हे एकाच ठराविक परीक्षा केंद्रावरील आहेत, आणि ते केंद्र आहे नागपूर… एकूण ६२ पैकी तब्बल २४ विद्यार्थी एकट्या नागपूर केंद्रावरून उत्तीर्ण झाले आहेत, नुसते उतीर्ण नाही तर TOPARS आलेले आहेत तर पुण्यातून जिथे स्पर्धा परीक्षेचा महापूर आहे, तिथून अवघे ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले,
संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थी परीक्षा देतात, पण गुणवत्ता यादीतले टॉपर्स एकाच शहरातल्या, एकाच केंद्रावर एकाच वेळी कसे काय उगवतात? हा निव्वळ योगायोग असू शकतो का? की या परीक्षा केंद्रावर संगनमताने काहीतरी वेगळंच शिजत होतं? घोटाळा फक्त केंद्रापुरता मर्यादित नाही, तर गुणांच्या आकड्यांमध्ये तर चक्क ‘मॅजिक’ पाहायला मिळालंय, ऑनलाईन परीक्षांमध्ये जेव्हा वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये पेपर होतात, तेव्हा गुणांचे समानीकरण करण्यासाठी नॉर्मलायझेशन ही पद्धत वापरली जाते। या पद्धतीत गुण दशांश चिन्हाच्या पुढे ५ ते ६ घरांपर्यंत मोजले जातात, सुषमा अंधारे यांनी सादर केलेल्या पुराव्यांनुसार, या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना दशांश चिन्हाच्या पुढेही अगदी तंतोतंत सारखेच गुण मिळाले आहेत, आणखी एक गंभीर आरोप असा आहे की, इतर परीक्षांमध्ये या उमेदवारांना मार्क्स खूपच कमी होते मात्र माथाडी कामगार निरीक्षक परीक्षेत अचानक त्यांच्या गुणांमध्ये अचानक एवढी मोठी वाढ करण्यात आली की ते थेट गुणवत्ता यादीत टॉपर बनलेत….
हेही वाचा : भटक्या-विमुक्तांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार? बावनकुळेंनी दिले महत्त्वाचे निर्देश
अंतिम गुणवत्ता यादी खासगी व्यक्तीने प्रसिद्ध केल्याचा आरोप
यावरूनही मोठा आरोप करण्यात आलाय तो म्हणजे अंतिम गुणवत्ता यादी हि एका खाजगी व्यक्तीकडून प्रकाशित करण्य्यात आली आहे, असा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय, तर भीमनवार यांनी या सर्व प्रश्नाची उत्तर द्यावीत असंही सुषमा अंधारेंनी म्हटलंय… हा लढा केवळ ६२ जागांचा नाही, तर हा लढा आहे त्या पारदर्शकतेचा जी प्रत्येक सामान्य घरातील विद्यार्थ्याचा हक्क आहे, शेतकरी, कष्टकरी, आणि मध्यमवर्गीय आई-वडील आपल्या रक्ताचं पाणी करून मुलांना पुण्यात, मुंबईत अभ्यासासाठी पाठवतात, पण जर निकाल आधीच मॅनेज होत असतील, तर या विद्यार्थ्यांच्या कष्टाला काय किंमत उरते?
सुषमा अंधारेंनी उपस्थित केलेले प्रश्न, मग तो नागपूर केंद्राचा संशयास्पद निकाल असो की पॉईंट्स मधली तफावत हे केवळ राजकीय आरोप नसून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेतून आलेले वास्तव आहे, आता सरकार यावर मौन सोडणार की माथाडी भरतीची ही चौकशी करून पारदर्शकता सिद्ध करणार? महाराष्ट्र या पेपर लिक आणि भरती घोटाळ्याच्या विळख्यातून कधी बाहेर पडणार याचं उत्तर मिळणं महत्वाच आहे… मात्र पेपरफुटीच्या घटना ताज्या असतानाच अशा प्रकारचा पॅटर्न समोर येणे ही धोक्याची घंटा आहे…









