Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • “शॉर्टकटने पैसे कमवण्याचा प्रयत्न…”, चेक बाऊन्स प्रकरणावरून अक्षय कुमारचं राजपाल यादवबाबत खळबळजनक वक्तव्य
Top News

“शॉर्टकटने पैसे कमवण्याचा प्रयत्न…”, चेक बाऊन्स प्रकरणावरून अक्षय कुमारचं राजपाल यादवबाबत खळबळजनक वक्तव्य

Akshay Kumar | प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) मागील काही दिवसांपूर्वी चेक बाऊन्स प्रकरणामुळे  अडचणीत आला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर तिहार तुरूंगात शिक्षा भोगून राजपाल यादव जामिनावर बाहेर आला. राजपालने चित्रपट निर्मिती करण्यासाठी 5 कोटींचं कर्ज घेतलं होतं. मात्र, त्याचा चित्रपट फ्लॉप ठरल्यामुळे त्याला कर्ज फेडता आलं नाही. त्याने दिलेले सर्व चेक बाऊन्स झाले होते त्यामुळे त्याला तिहार तुरूंगात आत्मसमर्पण करावं लागलं होतं.

हेही वाचा –  राजकारणात खळबळ! झिरवळांच्या व्हायरल व्हिडीओप्रकरणी पहिला FIR दाखल, थेट कारवाई कुणावर?

राजपालची बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी मदत केली होती. यामध्ये अभिनेता सोनू सूद हा राजपाल यादवच्या मदतीला धावून आला होता. तर आता या प्रकरणावरून अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) राजपाल यादवला सुनावलं आहे.

अक्षय कुमारच्या आगामी ‘भूत बंगला’ या चित्रपटात राजपाल यादव हा महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. तर या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अक्षय कुमारने राजपाल यादवच्या चेक बाऊन्स प्रकरणावर भाष्य करत खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

राजपाल यादवबाबत नेमकं काय म्हणाला अक्षय कुमार?

अक्षय कुमारने राजपाल यादवला चित्रपट निर्मीती न करण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे. त्यांने दिग्गज अभिनेते असरानी यांना आलेला एक अनुभव सांगितला. असरानी यांनी देखील त्यांच्या कठीण काळात चित्रपट निर्मिती केली होती. मात्र, त्यांना त्यात अपयश आल्याने ती त्यांची मोठी चूक असल्याचं त्यांनी अक्षयल सांगितलं होतं. याच अनुभवाच्या आधारावर अक्षयने राजपालला मोलाचा सल्ला दिला. अक्षय कुमार म्हणाला की, आपण अभिनेते आहोत आपलं हे काम नाही. चित्रपट निर्मात्यांचं काम खूप वेगळं असतं. त्यामुळे कधीही शॉर्टकटने पैसे कमावण्याचा प्रयत्न करू नये, असं म्हणच अक्षयने राजपालला मोलाचा सल्ला दिला.

दरम्यान, बऱ्याच वर्षांनंतर अक्षय कुमार आणि राजपाल यादव हे एकत्र काम करणार आहेत. भूत बंगला हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ते दोघं एकत्र येणार आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार, राजपाल यादवसह परेश रावल, वामिका गब्बी आणि तब्बू हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts