Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • डिटॉक्सच्या नावाखाली Water Fasting करणे धोकादायक; तज्ज्ञांनी सांगितले कारण अन् उपाय
लाईफस्टाईल

डिटॉक्सच्या नावाखाली Water Fasting करणे धोकादायक; तज्ज्ञांनी सांगितले कारण अन् उपाय

water Fasting

Water Fasting Risks: वॉटर फास्टिंगच्या नावाखाली शरीर डिटॉक्स करणे सध्या ट्रेंडमध्ये आहे, पण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की डॉक्टरांच्या देखरेखीशिवाय हे धोकादायक ठरू शकते. चला जाणून घेऊयात याचे करणे आणि सुरक्षित उपाय.

आजकाल वजन कमी करण्यासाठी आणि शरीर शुद्ध ठेवण्यासाठी वॉटर फास्टिंग (फक्त पाणी पिणे) लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे. सोशल मीडियावर हे हेल्थ ट्रेंड म्हणून दाखवले जाते, पण तज्ज्ञांचे मत आहे की डॉक्टरांच्या देखरेखीशिवाय केलेले वॉटर फास्टिंग शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.

हेही वाचा: एप्रिलमध्ये या ४ प्रमुख ग्रहांची गोचर; जाणून घ्या राशींवर काय परिणाम होणार

सुरुवातीला वजन कमी होताना दिसते, परंतु दीर्घकालीन फायदा नसतो आणि थकवा, डिहायड्रेशन, इलेक्ट्रोलाइट असंतुलन यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

कोणासाठी जास्त धोकादायक?

टाइप १ डायबिटीज असलेले लोक
आधीच कुपोषित किंवा कमी वजन असलेले लोक
नुकतेच वजन कमी झाले असेल किंवा नियमित औषध घेत असलेले लोक
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अशा लोकांसाठी वॉटर फास्टिंग हा मोठा धोका ठरतो आणि तो प्रयोग करण्यायोग्य नाही.

शरीरावर काय परिणाम होतात?

पहिल्या १-३ दिवसांत, शरीरातील ग्लायकोजेन कमी होते आणि शरीरातील पाण्याचे वजन कमी होते.

हळूहळू शरीर केटोसिसमध्ये प्रवेश करते, ज्यामुळे स्नायूंची झीज होते.

इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडते.

वजन कमी झाल्यावर स्नायूंची झीज होते.

सुरुवातीला इन्सुलिन संवेदनशीलता कमी होऊ शकते, पण नंतर त्यात सुधारणा होते.

कोणत्या समस्या होऊ शकतात?

सतत थकवा, डोकेदुखी आणि चक्कर येणे.

शरीरात युरिक ॲसिड वाढणे

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts