Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • बारामती पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, “भाजपने ठरवलं आहे…”
Top News

बारामती पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, “भाजपने ठरवलं आहे…”

CM Devendra Fadnavis | बारामती (Baramati) आणि राहुरी (Rahuri) विधानसभेची पोटनिवडणूक आता जवळ आली आहे. त्यामुळे काँग्रेस (Congress) पक्षाने बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघात आपले उमेदवार उभे करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याची चिन्हं दिसत आहेत. एकिकडे काँग्रेसने बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकासाठी आपले उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या आमदारकीसाठी बारामतीची पोटनिवडणूक लढवणार आहेत.

हेही वाचा – लग्नानंतर महिन्याभरातच ‘गुड न्यूज’? रश्मिका-विजयच्या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ

सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (CM Devendra Fadnavis) भाष्य केलं.  “मला असं वाटतंय की, सुनेत्रा ताईंना सर्व पक्षांनी पाठिंबा दिला पाहीजे. ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी, अशी माझी सर्वांना विनंती आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्रात यापूर्वी बिनविरोध पोटनिवडणूक झाली आहे. आर आर पाटील आबांच्या निधनानंतर भाजपने पोटनिवडणूक लढवायची नाही असं ठरवलं होतं. त्यावेळी भाजपने उमेदवार देखील दिला नव्हता. त्यामुळे आताही सर्व पक्षांनी सुनेत्रा ताईंना पाठिंबा देत ही निवडणूक बिनविरोध करावी, असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं.

बारामती पोटनिवडणूकीत शिवसेनेनं पाठिंबा देण्यासाठी सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. तसेच ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी, सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काँग्रेसला पाठिंबा देणार की सुनेत्रा पवारांना, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts