Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • “…तर आम्ही कोलकत्यावर हल्ला करू”, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या पोकळ धमकीने युद्ध पेटणार?
Top News

“…तर आम्ही कोलकत्यावर हल्ला करू”, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या पोकळ धमकीने युद्ध पेटणार?

Pakistan Threaten To Attacked On Kolkata | एकिकडे अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे तिन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानच्या (Afghanistan) तालिबानांमध्येही युद्धाची ठिणगी पेटली आहे. अफगाणिस्तानच्या तालिबान्यांनी पाकिस्तानच्या नाकात दम आणलेला आहे. अशातच आता या युद्धामुळे पाकिस्तानचे डोकं फिरलं असल्याचं दिसत आहे. कारण पाकिस्तानने आता थेट भारताशी पंगा घेतला आहे.

हेही वाचा – “नरकाचे दरवाजे उघडतील…”, इराणचा गंभीर इशारा; ट्रम्प यांच्या भूमिकेला म्हटलं ‘मूर्खपणाचं पाऊल’

पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी भारताला काय दिली धमकी?

भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. यावरून आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ (Khawaja Asif) यांनी भारताला पोकळ धमकी दिली आहे. आम्ही भविष्यात कोलकत्यावर हल्ला करू, अशी पोकळ धमकी ख्वाजा आसिफ यांनी भारताला दिली आहे. ख्वाजा आसिफ यांनी दिलेल्या या धमकीनंतर युद्ध पेटणार का? आणि भारत याला काय उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शनिवारी (4 एप्रिल) सियालकोटमध्ये माध्यमांशी संवाद साधताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला पोकळी धमकी दिली. जर भविष्यात संघर्ष पेटला तर भारताच्या सीमावर्ती भागावर किंवा मुंबई, दिल्लीपर्यंत पाकिस्तान मर्यादित राहणार नाही. आम्ही थेट मुंबई, दिल्लीसह कोलकत्यावरही हल्ला करू, अशी धमकी ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे.

ख्वाजा आसिफ यांनी भारताला नेमका काय दिला इशारा? युद्ध पेटणार?

भारताने कसल्याही प्रकारचे साहस करू नये. जर त्यांनी काही करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या पूर्वेतील सर्वात मोठ्या शहरावर कोलकत्तावर आम्ही मोठा हल्ला करू, असंही ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले की, पाकिस्तानला जागतिक स्तरावर बदनाम करण्याचा प्लॅन भारताचा आहे. भारत सध्या फॉल्स फ्लॅग ऑपरेशनची तयारी करत आहे. तसेच भारत त्यांच्या नागरिकांच्या माध्यमातून पाकिस्तानच्या नागरिकांना आणि पाकिस्तानला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही ख्वाजा आसिफ यांनी केला आहे.

दरम्यान, ख्वाजा आसिफ यांनी दिलेल्या या पोकळ धमकीनंतर भारत त्यांना काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच आसिफ यांच्या धमकीनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts