Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • व्हायरल व्हिडीओने खळबळ; खरातच्या कृत्यांमुळे पीडित महिलांचं जगणं झालं कठीण, झाला धक्कादायक खुलासा
Top News

व्हायरल व्हिडीओने खळबळ; खरातच्या कृत्यांमुळे पीडित महिलांचं जगणं झालं कठीण, झाला धक्कादायक खुलासा

Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) ढोंगी ज्योतिषी अशोक खरातने (Ashok Kharat) अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. खरातने अनेक महिलांच्या विश्वासाचा फायदा घेत त्याचे लैंगिक शोषण केले आहे. विवाहित महिला, तरूणी यांचे लैंगिक शोषण करत खरातने त्यांची मोठी फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) खरातला बेड्या ठोकल्या आहेत. तर सोशल मीडियावर खरातचे अनेक महिलांसोबतच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे अनेक पीडित महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.

हेही वाचा –  बारामतीत राजकीय लढत रंगणार? लक्ष्मण हाके विधानसभेसाठी मैदानात उतरणार, केली मोठी घोषणा

व्हायरल व्हिडीओंमुळे पीडित महिलांना मानसिक धक्का

जेव्हा खरातचा काळा कारनामा बाहेर आला तेव्हा पीडित महिलांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर पीडित महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. या प्रकरणातील अनेक पीडित महीला या नैराश्यात गेल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

खरातचे पितळ उघडे पडले तेव्हा ज्या महिलांचे त्याने लैंगिक शोषण करत फसवणूक केली होती त्या सर्व पीडित महिलांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. आत्तापर्यंत नऊ ते दहा पीडित महिलांनी मानसोपचार तज्ञांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. या पीडित महिला मानसिक धक्क्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच या प्रकरणाती व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पीडित महिलांना समाजात वावरणं देखील कठिण झालं आहे. त्यामुळे त्यांनी मानसोपचार तज्ञांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष तपास पथकाकडून पीडित महिलांची सतत चौकशी केली जात आहेत. तसेच या महिलांनी कोणतेही दडपण घेऊ नये म्हणून त्यांनी पूर्णपणे काळजी देखील विशेष तपास पथकाकडून घेतली जात आहे. तर त्यांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही देखील एसआयटीने दिली आहे. तसेच खरातचे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणातील व्हिडीओ इथून पुढे कोणीही व्हायरल करू नये, असे आवाहन देखील पोलीस प्रशासनाने केले आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts