US-Iran War | इराण (Iran), अमेरिका (US) आणि इस्त्रायल (Isreal) या देशांमध्ये जोरदार युद्ध (War) सुरू आहे. या युद्धामुळे तिन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकिकडे अमेरिका, इस्त्रालय इराणवर हल्ला करताना दिसत आहे. तर दुसरीकडे इराण जोरदार प्रत्युत्तर देताना दिसत आहे. तर इराणसोबतच्या युद्धात अमेरिकन सैन्याला सातत्याने मोठे नुकसान सोसावे लागत आहे.
हेही वाचा – व्हायरल व्हिडिओने खळबळ; खरातच्या कृत्यांमुळे पीडित महिलांचं जगणं झालं कठीण, झाला धक्कादायक खुलासा
अमेरिकेला इराणचा झटका, आणखी एक विमान केले नष्ट
इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) इस्फहान अणुकेंद्राजवळ अमेरिकेचे आणखी एक विमान नष्ट केले आहे. यामुळे अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे. इराणने आत्तापर्यंत अमेरिकेचे एफ-35, दोन एफ-15, एक एफ-16 आणि एक ए-10 लढाऊ विमानावर हल्ला करत ते नष्ट केले आहेत. इराणने अमेरिकेचे अनेक हेलिकॉप्टर्स, एमक्यू-9 ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा केला होता, ज्यामधून दोन अमेरिकन वैमानिकांनी बाहेर उडी मारली होती. यापैकी एक वैमानिक बेपत्ता होता, जो आज अमेरिकेला सापडला आहे. तर पहिल्या वैमानिकाची हल्ल्याच्या दिवशीच सुटका करण्यात आली होती. आता इराणने अमेरिकेला आणखी एक मोठा धक्का दिला आहे.
इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या कायदा अंमलबजावणी कमांड माहिती केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, ” दक्षिण इस्फहानमध्ये पोलिसांच्या विशेष दलांनी केलेल्या जोरदार गोळीबारात अमेरिकेचे एक सी-130 सहाय्यक विमान नष्ट करण्यात आले आहे.” तसेच या हल्ल्यापूर्वी आयआरजीसीने त्याच परिसरात अमेरिकेचा एक एमक्यू-9 ड्रोन पाडल्याचा दावा देखील केला होता.
Law Enforcement Command of the Islamic Republic of Iran (Faraja) Information Center: Moments ago, a US C130 support aircraft was destroyed by heavy fire from the police special forces unit in southern Isfahan.
— IRNA News Agency ☫ (@IrnaEnglish) April 5, 2026
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच इराणने अमेरिकेचे एफ-16 हे लढाऊ विमान लक्ष्य करत ते पाडले होते. याबाबतची माहिती इराणच्या निमलष्करी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने दिली होती. IRGC ने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या लष्कराने अमेरिकेचे एफ-16 लढाऊ विमान आणि एक एमक्यू-9 ड्रोन पाडले आहे.
IRGC ने केलेल्या दाव्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. आयआरजीसीने दावा केलेला की, त्यांनी दक्षिण इराणमधील शिराझ शहरावरून उडणारा एक अमेरिकन MQ-9 ड्रोन यशस्वीरित्या पाडला आहे. तसेच अमेरिकेच्या F-16 लढाऊ विमानावर हल्ला देखील केला असल्याचा दावाही आयआरजीसीने केला आहे. तर या घटनेबाबत अद्याप अमेरिकेने कोणतेही निवेदन जारी केलेले नाहीये.












