Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • इन्स्टाग्रामवर मैत्री झाली अन् नवविवाहितेन अल्पवयीन मुलासोबत नको ते कृत्य केलं
Top News

इन्स्टाग्रामवर मैत्री झाली अन् नवविवाहितेन अल्पवयीन मुलासोबत नको ते कृत्य केलं

newlywed woman minor lodge case

newlywed woman minor lodge case : एका अल्पवयीन मुलाला इन्स्टाग्राम मैत्री (Instagram Friendship) चांगलीच महागात पडलीय. 25 वर्षीय नवविवाहित महिलेने (Newly married women) 16 वर्षीय मुलाला (Sexual relations with a minor Boy) हॉटेलमध्ये बोलावलं आणि त्याच्यासोबत नको ते कृत्य केलं आहे. याप्रकरणी मुलाने महिलेविरोधात तक्रार (Complaint against a woman) दाखल केली असून पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.

हेही वाचा – नागपूर हादरलं! “वेळ काढून माझ्या अंत्ययात्रेला या…”, भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेनं केली आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय मुलगा आणि 25 वर्षीय महिला यांची ओळख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर झालेली. मैत्री झाल्यानंतर महिलेने मुलाला हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं आणि त्याच्यासोबत बळजबरी शारीरिक संबंध ठेवले. यानंतर, अल्पवयीन पीडित मुलाने पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपासानंतर पोलिसांनी तिला अटक केली.

सोशल मीडियाच्या माध्यामातून पीडित आणि महिलेची ओळख

पीडित मुलाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, महिलेचं नाव ख्याती विश्वकर्मा असं असून ती 25 वर्षांची आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून पीडित आणि महिलेची ओळख झाली आणि हळू हळू दोघांमध्ये गप्पा देखील वाढू लागल्या. त्यानंतर दोघे एकमेकांना भेटू देखील लागले.

पैशाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध प्रस्थापित केले

त्यानंतर 1 एप्रिल 2026 रोजी ख्याती विश्वकर्मा हिने मुलाला एका हॉटेलमध्ये बोलावलं. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर, महिलेने मुलावर भावनात्मक दबाव टाकला आणि आमिष दाखवत त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर महिलेने त्याला या घटनेबद्दल कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. यामुळे अल्पवयीन मुलगा मानसिक दबावाखाली आला. त्याचा फायदा घेत महिलेनं पिडित मुलाचे लैंगिक शोषन केलं.

ख्याती विश्वकर्मा हिचं काही महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह

आरोपी महिला ख्याती विश्वकर्मा हिचं काही महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झालेला आहे. लग्नाच्या पूर्वीपासून महिला पीडित मुलाच्या संपर्कात होती. 1 एप्रिल रोजी त्या महिलेने अल्पवयीन मुलाला हॉटेलमध्ये बोलावून त्याच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. संबंधित घटना छत्तीसगड येथे घडली आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts