Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • सुनेत्रा पवारांविरोधात 55 उमेदवार मैदानात; कोण कुठल्या पक्षातून? अंतिम यादी समोर
Top News

सुनेत्रा पवारांविरोधात 55 उमेदवार मैदानात; कोण कुठल्या पक्षातून? अंतिम यादी समोर

Sunetra Pawar | राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर बारामतीत विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक (Baramati By Election) पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या निवडणूक लढणार आहेत. काल (6 एप्रिल) सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सर्व पक्षांना सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. तर स्वत: सुनेत्रा पवार यांनीही काही बड्या नेत्यांना फोन करत त्यांच्याकडे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पाठिंबा मागितला असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याची माहिती देखील समोर आली आहे.

हेही वाचा – अजितदादांच्या अपघाताशी खरातचा संबंध? रोहित पवारांची खळबळजनक पोस्ट, केला मोठा खुलासा

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही?

बारामती पोटनिवडणूक आता बिनविरोध होणार नाहीये. कारण सुनेत्रा पवार यांच्याविरोधात 55 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात तब्बल 55 उमेदवारांनी 68 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याबाबतची माहिती बारामती निवडणूक अधिकारी स्वप्निल रावडे यांनी दिली आहे.

बारामती निवडणूक लढण्यासाठी अनेक बडे नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेस पक्षाने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच ते ही निवडणूक लढवण्यावर ठाम असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. करूणा मुंडे यांनी देखील सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर सुरूवातील ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ही निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. मात्र, महायुतीच्या काही बड्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधत त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर लक्ष्मण हाकेंनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे.

सुनेत्रा पवारांविरोधात या निवडणूकीत अनेक नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध होणार नाहीये. त्यामुळे आता सुनेत्रा पवार विरूद्ध काँग्रेस आणि अपक्ष असा सामना रंगणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुनेत्रा पवार यांच्या विरोधात कोण-कोण उतरले आहे रिगंणात

शिवाजी कोकरे – अपक्ष, संतोष कांबळे – भारतीय देशक्रांती पार्टी, विक्रम कोकरे – अपक्ष, अविनाश गायकवाड – अपक्ष, विजयकुमार भिसे – इंडियन नॅशनल काँग्रेस, विराज शिंदे – अपक्ष, अशोक खामगळ – अपक्ष, सुवर्णा गायकवाड – अपक्ष, प्रतिक्षा चव्हाण – आंबेडकरवादी रिपल्बिकन पार्टी, चंद्रकांत वाघमोडे – अपक्ष, दशरथ राऊत – भारतीय प्रजा सुराज्य पक्ष, सिद्धाराम सोमण्णा काकणकी – अपक्ष, विलास घोरपडे – अपक्ष, उन्मेश देशमुख – अपक्ष, दिनकर गायकवाड – अपक्ष, बाळासो धापटे – अपक्ष, सतिश सोनावणे – अपक्ष, योगेश रतेश्वर – अपक्ष, राहुल थोरात – अपक्ष, गोपाळ तंतरपाळे – अपक्ष, सिताराम रणदिवे – अपक्ष, आकाश मोरे – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, सिताराम रणदिवे – अपक्ष, मंगलदास निकाळजे – अपक्ष, मोहन राऊत – अपक्ष अशा अनेक अपक्ष नेते सुनेत्रा पवारांविरोधात निवडणुकीच्या मैदानात उभे राहिले आहेत.

v

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts