• Home
  • महाराष्ट्र
  • धक्कादायक! भिवंडीत 10 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; जिन्यातच रचला सापळा
Mumbai

धक्कादायक! भिवंडीत 10 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; जिन्यातच रचला सापळा

child harrasement

Mumbai Crime | सध्याच्या काळात मोठ्या लोकांसोबतच लहान मुलंही सुरक्षित नसल्याचं दिसत आहे. कारण आजकाल लहान मुलं एकटी दिसली की त्यांचे अपहरण करणे, त्यांच्यावर अत्याचार करणे अशा अनेक घटना घडताना दिसत आहेत. त्यामुळे पालक आपल्या मुलांना एकटं सोडणं बऱ्याचदा टाळत असतात. मात्र, घराजवळ मुलं ही एकटी वावरत असतातच. तर आता घराजवळही मुलं सुरक्षित नसल्याचं समोर येत आहे. कारण मुंबईमध्ये (Mumbai) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. घराजवळ असलेल्या परिसरात एका चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.

हेही वाचा – अजित पवारांच्या अपघातावरील व्हिडीओ बनवणारा युट्यूबर अटकेत, नेमकं प्रकरण काय?

भिवंडीत 10 वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग

मुंबईतील भिवंडी शहरात एका 10 वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनं भिवंडी शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तर विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं घडलं काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवारी (6 एप्रिल) संध्याकाळच्या वेळी 10 वर्षांची पीडित मुलगी ती राहत असलेल्या इमारतीच्या जिन्यावरून खाली येत होती. यावेळी आरोपी शाहरूख आयुब खान (वय 31) हा जिन्यातच सापळा रचून बसला होता. तर पीडित मुलगी जिन्यावरून खाली जात असताना त्याने मुलीला पकडले आणि तिच्यासोबत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला.

या घटनेनंतर मुलीने याबाबतची सर्व माहिती तिच्या कुटुंबियांना दिली . त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी तातडीनं पोलीस स्थानकात धाव घेतली आणि पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. या प्रकरणाची दखल घेत भिवंडी शहर पोलिसांनी आरोपी शाहरूखला बेड्या ठोकल्या असून त्याचावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तर सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेनं संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये मुलांच्या सुरक्षिततेबाबत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts