Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ग्रॅज्युएट्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी! आधार कार्ड संस्थेत पेड इंटर्नशिप सुरू; जाणून घ्या अर्ज कसा करावा
Top News

ग्रॅज्युएट्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी! आधार कार्ड संस्थेत पेड इंटर्नशिप सुरू; जाणून घ्या अर्ज कसा करावा

Aadhaar Card Paid Internship

Aadhaar Card Paid Internship: तुम्ही पदवी पूर्ण केलेले असाल किंवा शिकत असाल, नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आधार कार्ड संस्थेत आता पेड इंटर्नशिप सुरू झाली आहे

जर तुम्हाला आधार कार्डशी संबंधित संस्थेत काम करण्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) तर्फे इंटर्नशिपची शानदार संधी उपलब्ध आहे. या इंटर्नशिपसाठी अर्ज करणाऱ्या निवडलेल्या उमेदवारांना दरमहा २०,००० ते ४०,०००० पर्यंत स्टायपेंड मिळू शकतो.

हेही वाचा: जूनियर एनटीआर ‘ड्रैगन’ शूटिंग थांबली का? मेकर्सनी सांगितले खरे कारण

ही संधी कॉलेजमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच नुकतेच पदवी पूर्ण केलेल्यांसाठी खुली आहे. कामाचा अनुभव नसला तरीही अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १५ एप्रिल २०२६ आहे. तसेच यात एकूण २६ जागा उपलब्ध आहेत.

अधिक माहिती

B.Des – 2 जागा
M.Des – 2 जागा
B.Sc (गणित/सांख्यिकी) – 4 जागा
M.Sc (गणित/सांख्यिकी) – 4 जागा

इतर ग्रॅज्युएट व पोस्ट ग्रॅज्युएट्ससाठी देखील जागा आहेत

स्टायपेंड किती मिळेल?

गणित/सांख्यिकी ग्रॅज्युएट – 20,000
गणित/सांख्यिकी पोस्ट ग्रॅज्युएट – 30,000
B.Tech / B.Des / B.E / ग्राफिक्स ग्रॅज्युएट – 30,000
पोस्ट ग्रॅज्युएट (इतर) – 40,000

इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्र दिले जाईल. निवड DDG Selection Committee द्वारे केली जाईल.

अर्ज कसा करावा?

Google Form द्वारे रजिस्ट्रेशन करावे
नाव, ईमेल, मोबाईल नंबर, पत्ता व इतर आवश्यक माहिती भरावी
आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट करावे
इच्छुक उमेदवार CV आणि फोटो tech-internship@uidai.net.in

या ईमेलवर देखील पाठवू शकतात

अधिक माहितीसाठी UIDAI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

का घ्यावी ही संधी?

आकर्षक स्टायपेंड

रिअल वर्क अनुभव

सरकारची सुरक्षित इंटर्नशिप

भविष्यातील करिअरसाठी मजबूत प्रारंभ

ही संधी ग्रॅज्युएट्ससाठी सुवर्णसंधी आहे, त्यामुळे विलंब न करता अर्ज करावे.

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts