Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • खरात पापांचा ‘बाप’! 46 वर्षांपूर्वी अत्याचार केला, ग्रामस्थांनी चोप चोप चोपला..
Top News

खरात पापांचा ‘बाप’! 46 वर्षांपूर्वी अत्याचार केला, ग्रामस्थांनी चोप चोप चोपला..

Kharat assault case villagers beating

Kharat assault case villagers beating : नाशिकचा भोंदूबाबा खरातचं (Fraudulent Baba Kharat) पाप काही काल-परवाचं नाही; या लिंगपिसाट बाबाचं (Lingpisat Baba) पाप 46 वर्षे जुनं आहे. त्यानं 1980 साली म्हणजे वयाच्या 20 व्या वर्षी एका दूरच्या नातेवाईक महिलेचं लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आलीये. खरातचं हे पाप समजल्यानंतर ग्रामस्थांनी त्याला चांगलाच चोपून काढला होता. 46 वर्षांपूर्वी (first crime, 46 years ago) काय घडलं होतं? आणि ग्रामस्थांनी चोप चोप (villagers beat them) चोपल्यावर खरातचं काय झालं होतं? त्यावर बनवलेला हा खास लेख.. खरात, पापे अमाप; खरातला पापांचा बाप म्हणायला हरकत नाही इतकी पापं त्यानं त्याच्या आयुष्यात केली आहेत. आता तर त्यानं त्याच्याच गावात 46 वर्षांपूर्वी केलेल्या पापाची चर्चा होऊ लागलीये.

हेही वाचा – “तुमचा भाऊ मरेल…”, भीती दाखवून जाळ्यात अडकवलं; खरात अन् त्याच्या पत्नीने मिळून एका कुटुंबाला लुबाडलं, झाला मोठा पर्दाफाश

खरातनं वयाच्या 20 व्या वर्षी म्हणजे 1980 साली एका दूरच्या नातेवाईक महिलेचं लैंगिक शोषण केल्याच्या घटनेची सध्या चर्चा होतेय. संबंधित महिलेला मूल होत नसल्याचा फायदा घेऊन त्यानं तिला जाळ्यात ओढल्याची चर्चा जोर धरू लागलीये. खरातचे हे दुष्कृत्य जेव्हा गावाला समजलं तेव्हा संतापाची लाट उसळली होती. मग मात्र संतप्त गावकऱ्यांनी खरात याला चांगलाच चोप चोप चोपला होता.

खरातनं एका रात्रीत गाव सोडलं आणि तो फरार

या घटनेनंतर पोलिसांच्या भीतीनं खरातनं एका रात्रीत गाव सोडलं आणि तो फरार झाला. गाव सोडून पळालेला खरात तब्बल 15 वर्षे गायब होता. या काळात तो कुठं होता? कुणाच्या आश्रयाला होता? त्यानं तिथंही आपल्या पापांची मालिका सुरू ठेवली होती का? असे सवाल आता उपस्थित होतायत.

गर्भवती महिलेवर खरातनं लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस

“तुला मुलगाच होईल…” असं सांगून विधी करण्याच्या नावाखाली एका गर्भवती महिलेवर खरातनं लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलंय. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. कालच न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेल्या खरातची आज याच गुन्ह्यात एसआयटी पोलिस कोठडी मागण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील फिर्यादीनं खरातच्या काळ्या कारनाम्याबाबतचे इलेक्ट्रॉनिक पुरावेसुद्धा सादर केले आहेत.

कोर्टानं त्याला 21 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली

पोलिस कोठडीची मुदत संपल्यानं काल बुधवारी कोर्टानं त्याला 21 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याला तिसऱ्या गुन्ह्यात एसआयटीनं वर्ग करून न्यायालयाकडून ताबा घेत अटक केली. आता सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या आणखी एका नव्या गुन्ह्यात पोलिस कोठडी मिळवण्यासाठी आज पुन्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावेळी त्याला व्ही.सी. द्वारे न्यायालयात हजर केले जाणार आहे.

खरातनं सुरू केलेली पापांची मालिका 46 वर्षांनंतर खंडित

एसआयटी पथकानं कॅनडा कॉर्नरीवरील त्याच्या ‘ओकस प्रॉपर्टीज’ या कार्यालयाची झडती घेतली असता एका प्लास्टिकच्या डब्यात 22 रूद्राक्ष आढळून आले. शिवाय ‘एबीसीडी’ व 1 ते 26 पर्यंत अंक लिहिलेली 18 इंचाची पट्टी, शिवनिका संस्थानच्या नावानं छापलेले कोरे पावती पुस्तक, एक भिंगकाच, मळकट रंगाच्या पातळ द्रव्यानं भरलेली काचेची बाटली देखील आढळून आली. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आलंय. थोडक्यात काय तर, खरातनं सुरू केलेली पापांची मालिका 46 वर्षांनंतर म्हणजे 17 मार्च 2026 रोजी खंडित झाली.

हा पापांचा घडा फुटल्यानंतर त्यानं केलेली पापं उघड्यावर

त्यानं भोंदूगिरीचं हे जाळं 46 वर्षांपूर्वी विणायला सुरुवात केली होती, आज तोच त्यानं विणलेल्या जाळ्यात कसा अडकून पडलाय हे सारा देश पाहातोय. पण या 46 वर्षांमध्ये त्यानं केलेल्या पापांचा घडा आता फुटलाय. हा पापांचा घडा फुटल्यानंतर त्यानं केलेली पापं उघड्यावर आलीयेत. म्हणूनच म्हणावं लागतंय… खरात, पापे अमाप, खरात पापांचा बाप!

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts