AI+ Nova 2 Series India Launch: AI+ Nova 2 सिरीज भारतात लॉन्च केला असून 6000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. किंमत आणि इतर दमदार फीचर्सची माहिती वाचा एका क्लिकवर…
भारतीय स्मार्टफोन बाजारात AI+ Nova 2 सिरीजची एंट्री झाली आहे. या सिरीजमध्ये AI+ Nova 2 5G आणि AI+ Nova 2 Ultra 5G हे दोन मॉडेल्स सादर करण्यात आले आहेत. कमी किमतीत मोठी बॅटरी, चांगला कॅमेरा आणि स्टायलिश डिझाइन ही फोनची खासियत आहे.
आणखी वाचा: एप्रिल-मेमध्ये केस का जास्त गळतात? ९९% लोकांना खरं कारण माहित नाही…
AI+ Nova 2 5G
या फोनचा 4GB RAM आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट ८,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. इतर व्हेरिएंट्सची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. हा फोन १४ एप्रिलपासून दुपारी १२ वाजता फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. ब्लू, ब्लॅक, पिंक, ग्रीन आणि पर्पल अशा रंगांमध्ये हा फोन मिळणार आहे.
AI+ Nova 2 Ultra 5G
या स्मार्टफोनचा 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट १४,९९९ रुपयांत उपलब्ध होणार आहे. ऑफर्स आणि कॅशबॅकनंतर किंमत आणखी कमी होऊ शकते. हा फोन १७ एप्रिलपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी येईल. ब्लॅक, ग्रीन, ब्लू, पर्पल आणि रेड या रंगांमध्ये हा डिव्हाइस उपलब्ध असेल.
Ultra मॉडेलचे खास फीचर्स
या फोनमध्ये 6.78 इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 144Hz रिफ्रेश रेटसह येतो. यामध्ये MediaTek Dimensity 7400 प्रोसेसर देण्यात आला असून तो जलद आणि स्मूथ परफॉर्मन्स देतो. कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास, यात 50MP मुख्य कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स देण्यात आली आहे.
Nova 2 5G चे फीचर्स
या मॉडेलमध्ये ६.७४ इंच एचडी+ डिस्प्ले आणि १२०Hz रिफ्रेश रेट आहे. फोनमध्ये युनिसॉक प्रोसेसर असल्याने तो दैनंदिन वापरासाठी योग्य आहे.
फोटोग्राफीसाठी, ५०MP चा रियर कॅमेरा आणि ८MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
दोन्ही फोनमध्ये काय साम्य आहे?
दोन्ही स्मार्टफोनमध्ये ६०००mAh ची मोठी बॅटरी आहे. अल्ट्रा मॉडेल ३३W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, तर बेस मॉडेल १८W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.











