Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • धक्कादायक! दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी चोरी, कुटुंब झोपेत असताना चोरट्यांनी साधला डाव
Top News

धक्कादायक! दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी चोरी, कुटुंब झोपेत असताना चोरट्यांनी साधला डाव

Theft At Sarpanch Santosh Deshmukh’s House | बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोगचे (Massajog) सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh) यांच्या हत्येचे प्रकरण राज्यात चांगलेच गाजले होते. सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणी अनेक सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी संपूर्ण बीड जिल्हा रस्त्यावर उतरला होता. या घटनेनं सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. अशातच आता मस्साजोगमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे.

हेही वाचा – अभिनेता करण पटेलचा संसार मोडणार? 11 वर्षांनंतर घेणार घटस्फोट, बायकोने केला मोठा खुलासा

दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरात चोरट्यांचा शिरकाव

मस्साजोगमध्ये दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कुटुंबीय झोपेत असतानाच काही चोरट्यांनी डाव साधत घरफोडी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे मस्साजोगमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मध्यरात्री दिवंगत संतोष देशमुख यांच्या घरी चोरी झाली. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, आई, पत्नी अश्विनी देशमुख आणि कुटुंबातील इतर सदस्य गाढ झोपेत असताना काही चोरट्यांनी डाव साधत चोरी केली. तर देशमुख कुटुंबाला सकाळी उठल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, मस्साजोग गावात चोरट्यांनी मध्यरात्री देशमुख यांच्या घरासह अनेक ठिकाणी चोरी केली आहे. त्यांनी तलावाच्या परिसरात असलेलेल कॉपर केबल देखील चोरून नेले आहेत.

या घटनेबाबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मस्साजोगमध्ये 7 ते 8 ठिकाणी घरफोडी झाल्याचा प्रकार घडला आहे. संतोष देशमुख यांच्या घरातून किमती साहित्य चोरीला गेलेले नाहीये. पण, इतर लोकांच्या घरातून रोख रक्कम, सोनं चोरीला गेलं आहे, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे.

या घटनेची दखल केज पोलिसांसह फॉरेन्सिक टीम आणि बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं घेतली आहे. त्यांनी आता या घटनेचा पुढील तपास करण्यास सुरूवात केली आहे. सध्या केज पोलिसांसह फॉरेन्सिक टीम आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मस्साजोग गावात दाखल झाले असून ते कसून तपास करत आहेत.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts