Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
ताज्या बातम्या

मराठवाडा हादरला! परभणी, हिंगोलीसह अनेक जिल्ह्यांत भूकंपाचे धक्के

Marathwada Earthquake

Marathwada Earthquake update: मराठवाड्यातील परभणी, हिंगोलीसह अनेक जिल्ह्यांतील काही भागांमध्ये आज, शनिवारी ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८.४५च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले.

आज शनिवारी सकाळी मराठवाड्यातील (Marathwada Earthquake) काही जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. परभणी, हिंगोली आणि नांदेड परिसरात (Nanded earthquake) अचानक जमीन हल्ल्यासारखे वाटल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

सकाळी सुमारे ८.४५ वाजता हे धक्के जाणवले. अनेक ठिकाणी घरातील वस्तू हल्ल्या, तर काही नागरिक तातडीने घराबाहेर सुरक्षित ठिकाणी धावले. यामुळे स्थानिक भागात काही गोंधळाचे वातावरण होते. याच धक्क्यांचे परिणाम विदर्भातील यवतमाळ (Yavatma) आणि वाशीम जिल्ह्यांमध्येही (Washim earthquake) जाणवले. काही भागांत लोकांनी हलके हादरे जाणवल्याने सांगितले.

हेही वाचा: YOPD म्हणजे नेमकं काय? कोणाला धोका आणि सुरुवातीची लक्षणे कोणती?

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, या भूकंपाचा (earthquake) केंद्रबिंदू हिंगोली परिसरात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्राथमिक अंदाजानुसार भूकंपाची तीव्रता कमी असून साधारण ४.७ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेल्याची माहिती मिळते.

गेल्या काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli Districts) काही भागांमध्ये भूगर्भातून गूढ आवाज आणि सौम्य कंपन जाणवत असल्याच्या तक्रारीही स्थानिकांकडून समोर येत आहेत.

दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. सध्या कोणतीही जीवित किंवा मोठ्या वित्तहानीची माहिती समोर आलेली नाही, अशी प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts