• Home
  • ताज्या बातम्या
  • प्रभसिमरन, प्रियांश आणि अय्यरची अर्धशतकी खेळी; पंजाबचा हंगामातील तिसरा विजय
क्रीडा

प्रभसिमरन, प्रियांश आणि अय्यरची अर्धशतकी खेळी; पंजाबचा हंगामातील तिसरा विजय

पंजाबचा दबदबा कायम; लखनऊचा धुव्वा उडवत मिळवला पाचवा विजय

न्यू चंदीगड PBKS Best SRH : इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या हंगामातील 17वा साखळी सामना न्यू चंदीगड येथील मुल्लानपूर क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्स (Punjab kings) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderbad) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पंजाब किंग्ससमोर 220 धावांचं लक्ष्य होतं, जे त्यांनी 18.5 षटकांत सहज पूर्ण केलं आणि ६ गडी राखून विजय मिळवला. यंदाच्या हंगामातील हा पंजाबचा तिसरा विजय ठरला तर हैदराबादचा तिसरा पराभव झाला आहे (PBKS Beat SRH).

हेही वाचा : 8 सिक्सर, 5 चौकार… मुल्लानपूरमध्ये अभिषेकचं वादळ; जयसूर्या-बटलरची बरोबरी

हैदराबादची वादळी सुरुवात :

या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादनं सलामीवीरांच्या वादळी विक्रमी खेळीच्या बळावर 20 षटकांत 6 गडी गमावून 219 धावा केल्या. या सामन्यात हैदराबादकडून अभिषेक शर्मानं 74 धावा केल्या, तर ट्रॅव्हिस हेडनं 38 आणि हेनरिक क्लासेननं 39 धावा केल्या. या सामन्यात हैदराबादनं पहिल्या 6 षटकांतच 105 धावा करत नवा विक्रम केला. पंजाब किंग्सकडून शशांक सिंग आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले, तर झेवियर बार्टलेटनं एक बळी घेतला (ipl 2026).

पंजाबकडून तिघांची अर्धशतकं :

हैदराबादनं दिलेल्या 220 धावांच्या प्रत्युत्तरात पंजाब किंग्सच्या प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्या या सलामीच्या जोडीनं अवघ्या 6.2 षटकांत पहिल्या विकेटसाठी 99 धावा जोडून संघाला भक्कम सुरुवात करून दिली. प्रियांश आर्यानं 20 चेंडूंमध्ये 57 धावा केल्या, तर प्रभसिमरन सिंगनं 25 चेंडूंमध्ये 51 धावा केल्या. या दोघांच्या बाद झाल्यानंतर, पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरनं एका टोकाकडून डाव सावरला आणि 33 चेंडूंमध्ये नाबाद 69 धावा करुन संघाला विजय मिळवून दिला. सनरायझर्स हैदराबादकडून शिवांग शर्मानं गोलंदाजीत प्रभावी कामगिरी करत चार षटकांत 33 धावा देऊन तीन बळी घेतले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts