Breaking News :
  • Home
  • शैक्षणिक बातम्या
  • दिल्ली पुन्हा हादरली! आधी धावत्या कारमध्ये महिलेवर केला बलात्कार अन् नंतर…, धक्कादायक घटनेनं खळबळ
Top News

दिल्ली पुन्हा हादरली! आधी धावत्या कारमध्ये महिलेवर केला बलात्कार अन् नंतर…, धक्कादायक घटनेनं खळबळ

rape case

Delhi Crime | दिल्लीमध्ये (Delhi) एक धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीतील गाझियाबादमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनं संपूर्ण दिल्लीला हादरवून सोडले आहे. प्लॉट खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेनं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – आशा भोसले यांची प्राणज्योत मालवली; कधी, कुठे होणार अंत्यसंस्कार? जाणून घ्या

दिल्लीत धावत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

दिल्लीच्या गाझियाबादमधील तिलामोडमध्ये एक महिला प्लॉट खरेदी करण्यासाठी गेली होती. त्यावेळी धावत्या कारमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिला कारमधून रस्त्यावर फेकून देण्यात आले. नंतर आरोपींनी तेथून पळ काढल्याची घटना घडली आहे.

नेमकं घडलं काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही प्लॉट खरेदी करण्यासाठी गाझियाबादमधील लोणी येथे आली होती. तिथे गेल्यानंतर तिची भेट आशू आणि विकास नावाच्या प्रॉपर्टी डीलर्सशी झाली. तर 6 एप्रिल रोजी पीडित महिला ही दुपारच्या वेळेस प्लॉट खरेदी करण्यासाठी गाझियाबादला आली होती. त्यावेळी प्रॉपर्टी डीलर्स तिला तिलामोड येथील प्लॉट दाखवण्याच्या बहाण्याने घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी तिचे आदरातिथ्य करत तिला कोल्ड्रिंक्स प्यायला दिले. कोल्ड्रिंक्समध्ये त्यांनी गुंगीचं औषध टाकलं होतं. त्यानंतर प्रॉपर्टी डीलर्स विकास आणि आशूने पीडित महिलेला कारमध्ये बसायला सांगितलं. त्यानंतर पीडितेला गुंगी आल्याने ती बेशुद्ध पडली आणि तिच्यावर धावत्या कारमध्ये आरोपींनी बलात्कार केला.

पीडितेवर बलात्कार केल्यानंतर आरोपींनी तिला एका निर्जनस्थळी रस्त्यावरच फेकून दिले आणि तिथून पळ काढला. त्यानंतर 7 एप्रिल रोजी पीडित महिला शुद्धीवर आल्यानंतर तिला घडलेला प्रकार समजला. सध्या तिला भरतपूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच भरतपूर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत. यासाठी पोलिसांनी आपली पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts