Anjali Damania On Pratibha Chakankar | अशोक खरात प्रकरणात (Ashok Kharat Case) महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि त्यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर (Pratibha Chakankar) या चांगल्या अडचणीत सापडल्या आहेत. अशोक खरातसोबत प्रतिक्षा चाकणकर यांचे आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर या पार्श्वभूमीवर काल (13 एप्रिल) या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांची 8 तास कसून चौकशी केली. प्रतिभा चाकणकर आणि त्याच्या कुटुंबियांची समता पतसंस्थेत चार खाती आहेत. तर या खात्यांमधून 2 कोटी 40 लाखांचा व्यवहार झाल्याप्रकरणी प्रतिभा चाकणकरांची चौकशी करण्यात आली.
हेही वाचा – कोटींची संपत्ती, लक्झरी कार अन्… , अशोक खरात प्रकरणात ईडीचा छापा; झाला मोठा खुलासा
चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या नावावर असलेली ही सर्व बनावट खाती असून त्यावर बनावट स्वाक्षरी करण्यात आल्या असल्याचं प्रतिभा चाकणकरांनी सांगितलं आणि सर्व आरोप फेटाळून लावले. त्यानंतर अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी प्रतिभा चाकणकरांवर जोरदार निशाणा साधला आहे.
अंजली दमानिया यांनी प्रतिभा चाकणकरांविरोधात काय केला खुलासा?
अंजली दमानिया यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये त्यांनी अशोक खरात आणि प्रतिभा चाकणकर यांच्यातील संवादाचे कॉल डिटेल्स शेअर करत मोठा खुलासा केला आहे. अंजली दमानिया यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, प्रतिभा चाकणकर आज किती किती खोटं बोलल्या. खाते बनावट आहे, सह्या खोट्या आहेत, असं बोलून हात झटकले? KYC केलेले अकाउंट खोटे असूच शकत नाहीत, असं दमानिया म्हणाल्या.
पुढे त्यांनी प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरातचे यांचे कॉल डिटेल्स उघड केले. त्या म्हणाल्या की, कॉल रेकॉर्ड पहा म्हणजे कळेल… ते खालील प्रमाणे आहेत.
1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 या कालावधीत
प्रतिभा चाकणकर
136 कॉल रेकॉर्ड
17 कॉल सगळे कॉल खरातांनी प्रतिभाजींना केले.
218 मेसेज सगळे प्रतिभाजींनी खारातांना केले.
पुढे अंजली दमानिया म्हणाल्या की, मला मुलांबद्दल बोलायला आवडत नाही, पण आज तन्मय चाकणकर तिथे गेला होता म्हणून सांगते.
तन्मय चाकणकर
कॉल रेकॉर्ड 37
11 कॉल तन्मयने खारातांना केले
20 कॉल खरातांनी तन्मयला केले
8 sms तन्मय ने खरातांना केले
1 sms खरातांनी तन्मयला केला, असा मोठा खुलासा अंजली दमानिया यांनी केला आहे.
प्रतिभा चाकणकर आज किती किती खोटं बोलल्या.
“खाते बनावट आहे, सह्या खोट्या आहेत”असे बोलून हात झटकले?KYC केलेले अकाउंट खोटे असूच शकत नाहीत.
त्यांचे कॉल रेकॉर्ड पहा म्हणजे कळेल… ते खालील प्रमाणे आहेत.
१ एप्रिल २०२५ ते १७ मार्च २०२६ या कालावधीत
प्रतिभा चाकणकर
२३६ कॉल रेकॉर्ड… pic.twitter.com/WBQj1F1KJs
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 13, 2026
पुढे त्या म्हणाल्या की, हे सर्व बनावट आणि खोटं कसे असू शकेल, 219 मेसेज कसले होते ? त्या त्यांच्या वकील बाई महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या आहेत. हे “पूर्णवेळ” पद आहे. आयोगाचे सदस्य हे शासनाने नियुक्त केलेले पूर्णवेळ सरकारी पद मानले जाते. त्यामुळे त्यांना खाजगी वकिली करण्यास प्रतिबंध आहेत. बहुदा राष्ट्रवादी पक्षाने त्यांना पाठवले असेल, अशी खोचक टीकाही अजंली दमानिया यांनी केली.












