• Home
  • महाराष्ट्र
  • कोटींची संपत्ती, लक्झरी कार अन्… , अशोक खरात प्रकरणात ईडीचा छापा; झाला मोठा खुलासा
Top News

कोटींची संपत्ती, लक्झरी कार अन्… , अशोक खरात प्रकरणात ईडीचा छापा; झाला मोठा खुलासा

kharat 12

Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. अशोक खरातने महिलांवर लैंगिक अत्याचार, लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सध्या खरात प्रकरणाचा संपूर्ण तुपास विशेष तपास पथकाकडून (SIT) केला जात आहे. तसेच आता अशोक खरात प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आले आहेत, ज्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा – “त्यांच्या नावाने जाती धर्मात फूट पाडणे अन् कर्कश डीजे लावून…”, आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी राजकारण्यांना सुनावले खडेबोल

ईडीच्या तपासात कोणती माहिती आली समोर?

अशोक खरातचा आर्थिक गैरव्यवहार तपासण्यासाठी प्रवर्तन संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. ईडीने खरातचे आर्थिक गैरव्यवहार उघड करण्यासाठी अनेक ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये ईडीने पुणे, शिर्डी आणि नाशिकसह 11 ठिकाणांवर छापा टाकला होता. तर ईडीच्या या तपासात धक्कादायक खुलासे झाले आहेत.

अशोक खरातने नाशिक जिल्ह्यातील दोन सहकारी पतसंस्थांमध्ये काही व्यक्तींच्या नावाने बँक खाती उघडली होती. तर या खात्यांमध्ये खरात स्वत: नॉमिनी होता. तसेच या खात्यांवरील व्यवहारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी खरातने आपला स्वत:चा मोबाईल क्रमांक त्या खात्यांशी लिंक केला होता, अशी माहिती ईडीच्या तपासात समोर आली आहे.

ईडीच्या तपासात ढोंगी खरातच्या तब्बल 10 कोटी रूपयांच्या मालमत्तेची ओळख पटली असून त्यामध्ये अनेक जमिनींचा समावेश आहे. ढोंगी खरातने लोकांची फसवणूक करत जमा केलेला पैसा त्याच्या चार्टर्ड अकाउंटंट प्रकाश पोफळे आणि त्याचा मुलगा ललित पोफळे यांच्या मदतीने विविध जमिनींमध्ये गुंतवला होता. तसेच ईडीने प्रकाश पोफळे यांच्या निवासस्थानातून तब्बल 42 लाख रूपयांची रोकड जप्त केली आहे. सोबतच ई़डीने खरातची मर्सिडीज बेंझ कार आणि 2 कोटी 50 लाख रूपयांची बँक खाती देखील गोठवली आहेत.

दरम्यान, अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. अशोक खरातने आत्तापर्यंत अनेक महिलांचे, तरूणींचे लैंगिक शोषण केले आहे. या धक्कादायक प्रकाराचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले आहेत. या भोंदू खरातने महिलांवर अत्याचार केले आहेत, अनेक लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे भोंदू खरातचे अनेत बड्या राजकीय नेत्यांसोबत, बड्या अधिकाऱ्यांसोबत जवळचे संबंध होते.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts