• Home
  • ताज्या बातम्या
  • अजित पवारांना न्याय मिळणार? ‘जस्टिस फॉर दादा’ म्हणत अमोल मिटकरींची मोठी घोषणा
ताज्या बातम्या

अजित पवारांना न्याय मिळणार? ‘जस्टिस फॉर दादा’ म्हणत अमोल मिटकरींची मोठी घोषणा

mitkari pawar

Amol Mitkari On Ajit Pawar Accident | राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनानं संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवारांचा खरंच अपघात (Ajit Pawar Plane Crash) होता की घातपात होता? असा संशय अजूनही व्यक्त केला जात आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे (NCP) नेते, आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मोठा दावा केला आहे. व्हीएसआर (VSR) कंपनीचा मालक आणि ढोंगी अशोक खरातचे (Ashok Kharat) जवळचे संबंध असल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. तसेच अमोल मिटकरींनी अजित पवारांना न्याय मिळण्यासाठी मोठी घोषणा देखील केली आहे.

हेही वाचा – परतवाड्यातील नराधमांनी 180 तरुणींना कसं अडकवलेलं आपल्या जाळ्यात? धक्कादायक माहिती समोर

अमोल मिटकरींनी नेमकी काय केली घोषणा?

अजित पवारांना न्याय देण्याच्या मागणीसाठी अमोल मिटकरींनी मोठी घोषणा केली आहे. अजित दादांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रात ‘जस्टिस फॉर दादा संवाद यात्रा’ काढण्यात येणार असल्याची घोषण मिटकरींनी केली आहे. 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असून या दिवशी या संवाद यात्रेला सुरूवात करण्यात येणार आहे. प्रत्येक गावामध्ये जाऊन अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव घेण्यात येणार असल्याची माहिती मिटकरींनी दिली.

अमोल मिटकरींनी खरातचा उल्लेख करत केले गंभीर आरोप

भोंदू अशोक खरातचे आणि व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकाचे जवळचे संबंध आहेत. व्हीके सिंग हा अशोक खरातचा भक्त आहे, असा गंभीर आरोप अमोल मिटकरींनी केला आहे. तसेच अजितदादा हे कुणाच्या सांगण्यावरून विमानात बसले होते. त्यानंतर खरातच्या खात्यावर 25 कोटींचे ट्रांझेक्शन झालेले, या सर्व गोष्टी अद्याप गुलदस्त्यात आहेत, असा दावाही मिटकरींनी केला आहे.

पुढे अमोल मिटकरींनी मोठा इशारा देखील दिला. ते म्हणाले की, लवकरच भोंदू खरात सीडीआर काढावा. अजितदादांच्या विमान अपघाताच्या चौकशीसाठी आणि त्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भोंदू खरातचा सीडीआर काढावा. नाहीतर महाराष्ट्राच्या जनतेचा संताप उसळला तर तो ईशान्येश्वर मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पेटत जाणार, असा थेट इशारा मिटकरींनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts