Memory Boosting Drink Recipe: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत विसरणे आणि एकाग्रता कमी होणे ही सामान्य बनली आहे. अशावेळी मेंदू तल्लख ठेवण्यासाठी सकाळच्या नाश्त्याला घेतले जाणारे हे सुपर हेल्दी ड्रिंक स्मरणशक्ती सुधारण्यास आणि मानसिक ऊर्जा वाढवण्यास मदत करू शकते.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत विसरणे, लक्ष विचलित होणे आणि एकाग्रता कमी होणे या समस्या अनेकांना जाणवत आहेत. कामाचा ताण, अपुरी झोप आणि चुकीचा आहार याचा थेट परिणाम मेंदूच्या कार्यक्षमतेवर होतो. अशावेळी मेंदूला योग्य पोषण देणे गरजेचे आहे.
हेही वाचा: झटपट नाश्ता! 5 मिनिटांत तयार होणारा टेस्टी दही ब्रेड; आजचं ट्राय करा
तज्ज्ञांच्या मते, सकाळच्या नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्वाचा आहार असतो. जर त्यात योग्य पोषक घटकांचा समावेश केला तर स्मरणशक्ती आणि एकाग्रता दोन्ही सुधारू शकतात.
साहित्य
1 केळ थोडी ब्लूबेरी किंवा कोणतेही हंगामी फळ
1 ग्लास बदाम दूध किंवा नारळ पाणी
एक मूठ पालक
1 चमचा अक्रोड किंवा जवस
चिमूटभर हळद
1 चमचा मध
कृती
सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून चांगले ब्लेंड करा. हे ड्रिंक लगेच सकाळच्या नाश्त्यासोबत प्या.
हे ड्रिंक कसे फायदेशीर आहे?
हे ड्रिंक मेंदूला आवश्यक अँटीऑक्सिडंट्स, ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि जीवनसत्त्वे पुरवते. यामुळे स्मरणशक्ती सुधारते, एकाग्रता वाढते आणि मानसिक थकवा कमी होतो.






