Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • विमानातील प्रवासी अचानक रडू आणि ओरडू लागले, काहींनी देवाला प्रार्थनाही केली; नेमकं प्रकरण काय?
ताज्या बातम्या

विमानातील प्रवासी अचानक रडू आणि ओरडू लागले, काहींनी देवाला प्रार्थनाही केली; नेमकं प्रकरण काय?

airplane

Hyderabad Hubli Flight : खराब हवामानामुळं हैदराबादहून हुबळीला जाणारे फ्लाय91 चं विमान बंगळूरुला वळवण्यात आलं. विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. रविवारी तीन तास हवेत असलेल्या या विमानामुळं प्रवासी घाबरले आणि काही जण रडू लागले. विमानातील प्रवाशांनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा : मोठी राजनैतिक हालचाल; रियाधमध्ये अजित डोवाल यांनी सौदी नेत्यांची घेतली

विमान बंगळूरुला वळवण्यात आलं :

सूत्रांनी सांगितलं की, विमान दुपारी 3:30 च्या सुमारास हैदराबादहून निघालं होतं आणि दुपारी 4:30 च्या सुमारास हुबळीला पोहोचणार होतं, परंतु प्रतिकूल हवामानामुळं ते उतरु शकलं नाही. एका विमानतळ अधिकाऱ्यानं सांगितलं, “खराब हवामानामुळं हैदराबादहून हुबळीला जाणारे विमान बंगळूरुला वळवण्यात आलं. असं विमान वळवणं ही एक मानक सुरक्षा प्रक्रिया आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, हवामान सुधारेल या आशेनं विमान सुमारे एक तास हुबळीवर घिरट्या घालत होते, त्यानंतर ते बंगळूरुला वळवण्यात आलं.

रात्री 11 वाजता विमान हुबळीसाठी रवाना :

ते म्हणाले, “ही एक सामान्य प्रक्रिया आहे.” हवामान सुधारण्याची वाट पाहत असताना विमानं काही वेळ घिरट्या घालतात. हा वैमानिकाचा निर्णय असतो.” विमानतळाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, विमान नंतर सायंकाळी 6:30 च्या सुमारास बंगळूरुमध्ये उतरलं आणि हवामान सुधारल्यानंतर रात्री 11च्या सुमारास हुबळीला परत नेण्यात आलं.

विमानात होते 22 प्रवासी :

सूत्रांनी सांगितलं की, विमानात 22 प्रवासी होते. अधिकाऱ्यांनी परिसरातील हवामानामुळं झालेल्या अशाच प्रकारच्या व्यत्ययांचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की, मुंबईहून कोल्हापूरला जाणारं दुसरं विमानही गोव्याला वळवावं लागलं होतं. अधिकाऱ्यानं सांगितलं, “सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. कोणतीही अडचण नाही.”

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts