Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • “अमेरिकेसोबत चर्चा करण्यात आम्हाला रस नाही…”, इराणने स्पष्टच सांगितलं, चर्चेला दिला नकार
ताज्या बातम्या

“अमेरिकेसोबत चर्चा करण्यात आम्हाला रस नाही…”, इराणने स्पष्टच सांगितलं, चर्चेला दिला नकार

Iran-US War | सध्या अमेरिका (US) आणि इराणमध्ये (Iran) युद्धविरामासाठी दुसऱ्यांदा चर्चा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशातच आता इराणने अमेरिकेसोबत चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे त्यांचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी.व्हान्स यांच्या नेतृत्वाखाली वाटाघाटी करणाऱ्यांचे एक पथक इस्लामाबादला पाठवत असले तरी, आता आम्हाला त्यांच्यासोबत शांतता चर्चेत रस नाही, असं इराणने स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा – शरद पवारांना रूग्णालयात केलं दाखल, सुप्रिया सुळेंनी प्रकृतीबाबत दिली मोठी माहिती

इराणने अमेरिकेसोबत चर्चा करण्यास का दिला नकार?

इराणने म्हटलं आहे की, धमक्या आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत. जोपर्यंत अमेरिका इराणी बंदरांवरील नाकेबंदी उठवत नाही, तोपर्यंत त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची चर्चा शक्य नाही. तसेच आमची अमेरिकेसोबत चर्चेची दुसरी फेरी घेण्याची कोणतीही योजना नाही, असं इराणने सांगितलं आहे.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सांगितले की, अमेरिकेसोबत चर्चेची दुसरी फेरी घेण्याची आमची कोणतीही योजना नाहीये. जर अमेरिकेने इस्लामाबादमध्ये एक पथक पाठवले तर ती चिंतेची बाब असेल, असं बघाई यांनी म्हटलं आहे.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, अमेरिकेसोबतच्या चर्चेच्या पुढील फेरीसाठी आम्ही इस्लामाबादला कोणतेही शिष्टमंडळ पाठवलेले नाही. अमेरिका आपल्या आश्वासनांपासून सातत्याने माघार घेत आहे. जोपर्यंत इराणच्या बंदरांवरील अमेरिकेची नौदल नाकेबंदी उठवली जात नाही आणि ट्रम्प यांच्या धमक्या थांबत नाहीत, तोपर्यंत अमेरिकेशी चर्चा करण्यास आम्हाला रस नाही, असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts