Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • मोठी बातमी! भारताकडे जाणाऱ्या जहाजावर आयआरजीसीचा होर्मुझमध्ये हल्ला; जहाज जप्त करत इराणला नेलं
Top News

मोठी बातमी! भारताकडे जाणाऱ्या जहाजावर आयआरजीसीचा होर्मुझमध्ये हल्ला; जहाज जप्त करत इराणला नेलं

US Iran War : इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं (IRGC) दोन जहाजांवर हल्ला करुन ती जप्त केली आहेत. ही जहाजं इराणला नेली जात आहेत. त्यापैकी एक जहाज भारताकडे येत होतं. इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीनुसार, या जहाजांची ओळख एमएससी फ्रान्सिस्का (MSC Francesca) आणि एपामिनोड्स (Epaminodes) अशी पटली आहे. एमएससी फ्रान्सिस्कावर पनामाचा ध्वज आहे, तर एपामिनोड्सवर लायबेरियाचा ध्वज आहे.

हेही वाचा : केईएम हॉस्पिटलला नवं नाव देणार? मंगलप्रभात लोढा यांचा पालिकेकडे प्रस्ताव

मुंद्रा बंदराकडे जात होतं जहाज :

जहाज ट्रॅकिंग डेटानुसार, इराणनं जप्त केलेलं एपामिनोड्स हे जहाज गुजरातमधील मुंद्रा बंदराकडे जात होतं. दुबईहून आपला प्रवास सुरु करुन भारताकडे निघालेल्या या जहाजावर आयआरजीसीनं हल्ला करुन ते जप्त केलं. भारतीय बंदराकडे जाणाऱ्या या जहाजाच्या जप्तीमुळं सागरी सुरक्षा आणि पुरवठा साखळीबाबत भारताची चिंता वाढली आहे.

जहाजं जप्त करण्याबाबत इराणनं काय म्हटलं :

इराणच्या नौदलानं एका निवेदनात म्हटलं आहे की, एमएससी-फ्रान्सिस्का (MSC-FRANCESCA) आणि एपामिनोड्स (EPAMINODES) ही दोन जहाजं आवश्यक परवानगीशिवाय कार्यरत होती आणि त्यांनी नेव्हिगेशन प्रणालीमध्ये फेरफार करुन सागरी सुरक्षेला धोका निर्माण केला होता. आयआरजीसी (IRGC) नौदलानं ती जहाजं ताब्यात घेतली आणि इराणी किनाऱ्यावर आणली. दोन्ही जहाजं सध्या इराणी सागरी हद्दीत असून, त्यांच्यावरील माल, कागदपत्रे आणि संबंधित नोंदींची तपासणी केली जात आहे.

इराणनं दिला इशारा :

आयआरजीसीनं पश्चिम आशियातील अमेरिकन तेल कंपन्या आणि तेल विहिरींना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. इराणनं इशारा दिला आहे की, जर त्यांच्या पायाभूत सुविधांवर हल्ला झाला, तर पश्चिम आशियातील अमेरिकेच्या मालकीच्या सर्व तेल विहिरी नष्ट केल्या जातील. इराणनं हे स्पष्ट केलं आहे की ते अमेरिकेच्या मालकीच्या सर्व तेल कंपन्यांवर निवडकपणे हल्ला करतील.

भारतीय जहाजांवर झाला होता गोळीबार :

यापूर्वी, होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणी सागरी हद्दीजवळ तीन जहाजांवर वेगवान गोळीबार करण्यात आला. तीन मालवाहू जहाजांना लक्ष्य करण्यात आलं होतं. अहवालानुसार, हल्ला करण्यापूर्वी आयआरजीसीच्या एका गनबोटनं अचानक गोळीबार सुरू केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जहाजांना वाहतुकीची परवानगी होती, परंतु हल्लेखोरांनी गोळीबार करण्यापूर्वी कोणताही रेडिओ संदेश किंवा इशारा दिला नाही.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts