• Home
  • लाईफस्टाईल
  • घरगुती उपायांनी ब्लॅकहेड्स हटवा अन् मिळवा उजळ त्वचा; जाणून घ्या उपाय
ताज्या बातम्या

घरगुती उपायांनी ब्लॅकहेड्स हटवा अन् मिळवा उजळ त्वचा; जाणून घ्या उपाय

blackheads

Blackheads Removal Home Remedies | चेहऱ्यावर दिसणारे ब्लॅकहेड्स (Blackheads) हे अनेकांसाठी सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. त्वचेतील अतिरिक्त तेल, धूळ आणि घाण यामुळे छिद्रे बंद होतात आणि त्यातून ब्लॅकहेड्स तयार होतात. यामुळे त्वचा निस्तेज दिसते आणि नैसर्गिक चमक कमी होते. मात्र, योग्य स्किन केअर आणि काही सोपे घरगुती उपाय वापरून ब्लॅकहेड्स काढणे, छिद्रांमधील घाण साफ करणे आणि त्वचा पुन्हा उजळ व निरोगी बनवणे सहज शक्य आहे. जर तुम्हालाही ब्लॅकहेड्सची समस्या असेल तर तुम्ही काही प्रभावी उपाययोजना करून या समस्येपासून सुटका मिळवू शकता. चला तर मग आता आपण ब्लॅकहेड्स काढण्यासाठी कोणते उपाय करावेत हे जाणून घ्या?

ब्लॅकहेड्स काढण्यासाठी घरगुती उपाय कोणते?

वाफ घेणे – त्वचेची छिद्रे उघडण्यासाठी वाफ घेणे फायदेशीर मानले जाते. यामुळे छिद्रे उघडण्यास मदत होते आणि ब्लॅकहेड्स काढणे सोपे होते. त्यानंतर, चेहऱ्यावर फेस मास्क लावा. यामुळे ब्लॅकहेड्स सहस निघून जातात आणि त्वचा मुलायम होण्यास मदत होते.

स्वच्छता – ब्लॅकहेड्स नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी चेहऱ्याची स्वच्छता राखा. दिवसातून किमान दोनदा सौम्य फेस वॉशने आपला चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे तेल आणि घाण निघून जाईल, ज्यामुळे ब्लॅकहेड्स कमी होण्यास मदत होईल.

एक्सफोलिएट करा: ज्यांना खूप ब्लॅकहेड्स आहेत त्यांनी आठवड्यातून 1 ते 2 वेळा स्क्रब वापरावा. यामुळे मृत त्वचा निघून जाते. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर ओट्स, बेसन किंवा इतर स्क्रबसारखे कोणतेही घरगुती उत्पादन देखील वापरू शकता. यामुळे मृत त्वचेच्या पेशी निघून जातात आणि रोमछिद्रे स्वच्छ होतात.

टोमॅटो – चेहऱ्यावर टोमॅटोची फोड चोळल्याने घाण आणि ब्लॅकहेड्सदेखील निघून जातात. तसेच, त्यामुळे त्वचेची छिद्रेही स्वच्छ होतात.

मध आणि लिंबू: ब्लॅकहेड्स काढण्यासाठी एक चमचा मधात एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि ते लावा. यामुळे ब्लॅकहेड्स कमी होतात आणि त्वचेचा रंग सुधारतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts