Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • दिल्लीचा 75 धावांत धावांत खुर्दा; दमदार गोलंदाजीच्या बळावर RCB चा दणदणीत विजय
क्रीडा

दिल्लीचा 75 धावांत धावांत खुर्दा; दमदार गोलंदाजीच्या बळावर RCB चा दणदणीत विजय

दिल्लीचा 75 धावांत धावांत खुर्दा; दमदार गोलंदाजीच्या बळावर RCB चा दणदणीत विजय

नवी दिल्ली RCB Beat DC : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं आयपीएल 2026 चा 39 वा सामना सहज जिंकला. संघानं दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा 81 चेंडू शिल्लक असताना 9 गडी पराभव केला. आरसीबीच्या गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सला अवघ्या 75 धावांवर गुंडाळले. त्यानंतर आरसीबीनं स्फोटक फलंदाजी करत 7 व्या षटकातच सामना जिंकला.

हेही वाचा : राघव चढ्ढांसह 7 खासदारांच्या पक्षांतराला राज्यसभा अध्यक्षांची परवानगी; सभागृहात भाजपाची

आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय :

आयपीएलमध्ये चेंडू शिल्लक असताना सर्वात मोठा विजय मिळवण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. या संघानं 2008 च्या हंगामात केकेआरला 87 चेंडू शिल्लक असताना पराभूत केलं होतं. आरसीबी आता या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. यादीत तिसऱ्या क्रमांकावर स्पर्धेतून बाहेर पडलेल्या कोची टस्कर्स केरळाचा समावेश आहे, त्यांनी 2011 मध्ये राजस्थान रॉयल्सला 76 चेंडू शिल्लक असताना पराभूत केलं होतं.

सामन्यात काय झालं :

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या, दिल्ली कॅपिटल्सची रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या घातक गोलंदाजीमुळं दयनीय अवस्था झाली. त्यांनी अवघ्या 9 धावांवर 6 विकेट गमावल्या. संपूर्ण संघ अवघ्या 75 धावांत सर्वबाद झाला. आरसीबीसाठी जोश हेझलवूडनं सर्वाधिक 4 बळी घेतले. भुवनेश्वर कुमारनं 3 फलंदाजांना बाद केले. दिल्लीसाठी अभिषेक पोरेलनं सर्वाधिक 30 धावा केल्या. प्रत्युत्तरात, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरनं केवळ 6.3 षटकांत केवळ 1 गडी गमावून 76 धावांचं लक्ष्य पूर्ण केले. आरसीबीसाठी विराट कोहलीनं 23 धावा आणि देवदत्त पडिक्कलने 34 धावा केल्या. दिल्लीसाठी काईल जेमिसननं एक बळी घेतला.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts