Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • नसरापूरच्या दुर्दैवी घटनेत शासनाचा पाठिंबा; विशेष सरकारी वकील नेमले, वाचा घटनेची सविस्तर माहिती
Pune

नसरापूरच्या दुर्दैवी घटनेत शासनाचा पाठिंबा; विशेष सरकारी वकील नेमले, वाचा घटनेची सविस्तर माहिती

Narsapur Incident: नसरापूर येथील दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे. घटनेच्या वेळी पीडित मुलीच्या कुटूंबाशी थेट संपर्क साधून त्यांना प्रशासनाच्या पाठिंब्याबाबत माहिती देण्यात आली आहे.

स्थानिक आमदार श्री. शंकर मांडेकर यांच्या माध्यमातून गावकऱ्यांशी संवाद साधत प्रशासनाने परिस्थितीची पूर्ण चौकशी करण्याचे अश्वासन दिले आहे. या कठीण प्रसंगी शाषनाने कुटुंबाच्या पाठीशी उभे राहून विशेष सरकारी वकील नेमक्याची प्रक्रिया सुरू केली असून, प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात होण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

हेही वाचा: नसरापूर प्रकरणी चिमुकलीचा मृतदेह रस्त्यावर ठेवून नवले पुलावर ठिय्या; सुनेत्रा पवारांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट, आरोपील तात्काळ फाशी देण्याची मागणी

माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पावस यांनी पीडित कुटूंबाला आश्वासन दिले आहे की या घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तीला योग्य ती शिक्षा मिळेल. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून याबाबत अधिकृत पत्रेही कुटूंबाला देण्यात आले आहे.

याबरोबरच महिला व बालविकास विभागाच्या ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत पीडित कुटूंबाला आवश्यक ती मानसिक व सामाजिक मदत दिली जाणार आहे. विभागीय अधिकाऱ्यांना ही प्रक्रिया जलद गतीने पार पाडण्यासाठी सूचना दिल्या गेल्या आहेत.

घटनेनंतर प्रशासनाने केलेले तत्पर आणि संवेदनशील पाऊल, तसेच शासनाचा पाठिंबा, या कठीण प्रसंगी कुटुंबासाठी दिलासा ठरत आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts