Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काल तब्बल 6 तास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत बैठक घेतली…पक्षातील विविध विषयांवर त्यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे..या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलण्यावर देखील चर्चा झाल्याची माहिती आहे…प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया या टीकेकडे दुर्लक्ष करून कामाकडे लक्ष द्यावे, असं म्हटलं आहे..पण सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्या या 6 तासाच्या बैठकीमुळे भाजपमध्ये नाराजी पसरल्याची चर्चा आहे…मात्र भेट सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांची झाल्याने भाजपमध्ये का नाराजी पसरली आहे? असा प्रश्न निर्माण झालाय…या भेटीमुळे भाजपला कोणता तोटा होणार? 2029 मध्ये प्रशांत किशोर यांच्या मदतीने राष्ट्रवादी भाजपचा गेम करणार का?
सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्या बैठकीत काय चर्चा झाली? ( Sunetra Pawar )
जनसुराजचे संस्थापक प्रशांत किशोर ( Prashant Kishor ) यांनी नुकतंच बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवणुकीतून विजय मिळवला आहे…प्रशांत किशोर यांनी आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे…यावेळी सुनेत्रा पवार आणि इतर नेत्यांसोबत प्रशांत किशोर यांची 6 तास बैठक झाली…या बैठकीला खासदार पार्थ पवार देखील उपस्थित होते, अशी माहिती आहे…मात्र या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे… राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण धुरा आता सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आली आहे.. अशा अत्यंत संवेदनशील आणि आव्हानात्मक काळात पार पडलेल्या या 6 तासांच्या गुप्त बैठकीमुळे महायुतीमध्ये मोठ्या चर्चांना उधाण आले आहे… या बैठकीत केवळ पक्षाच्या पुनर्बांधणीवरच चर्चा झाली नाही, तर 2029 च्या आगामी विधानसभा निवडणुकांचा पाया रचण्याच्या दृष्टीने अत्यंत आक्रमक रणनीती आखण्यात आल्याची सुत्रांची माहिती आहे…
या बैठकीदरम्यान प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या सद्यस्थितीचा आढावा घेत सुनेत्रा पवारांना अनेक महत्त्वाचे आणि धाडसी सल्ले दिले आहेत.. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी थेट पक्षाच्या संघटनात्मक रचनेवर बोट ठेवत सध्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या कार्यपद्धतीबाबत काही निरीक्षणे नोंदवली… पक्ष तळागाळापर्यंत मजबूत करायचा असेल आणि कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरायचा असेल, तर प्रदेशाध्यक्ष पदासह पक्ष संघटनेत तातडीने मोठे फेरबदल करणे गरजेचे आहे, अशी थेट सूचना प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) यांना दिल्याची माहिती आहे… याशिवाय, विरोधी पक्षांकडून, विशेषतः काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार यांच्यावर सातत्याने होणाऱ्या ‘गुंगी गुडिया’ यासारख्या वैयक्तिक आणि राजकीय टीकेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचा सल्ला त्यांनी दिला.. अशा टीकेला उत्तरे देण्यात वेळ आणि ऊर्जा वाया घालवण्याऐवजी सुनेत्रा पवारांनी स्वतःला जनतेच्या कामात व्यस्त ठेवावे, थेट लोकसंपर्कावर भर द्यावा आणि आपली एक कार्यक्षम नेत्या म्हणून प्रतिमा तयार करावी, असे प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांना आवर्जून सांगितल्याची माहिती आहे…
हेही वाचा : भाजप-RSS चा नवा गेमप्लॅन! जेन झी मतदारांना आकर्षित करण्यासाठी बदललं
राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रशांत किशोर यांचा गेम प्लॅन ( Prashant Kishor )
प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी पक्षासाठी एक मोठा कृती आराखडा तयार केला आहे…सध्या राज्यात कोणत्याही मोठ्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत.. याच शांततेच्या काळाचा फायदा उठवून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावावी, असे किशोर यांनी स्पष्ट केले.. याचाच एक भाग म्हणून प्रशांत किशोर आणि त्यांची टीम लवकरच संपूर्ण महाराष्ट्रभर एक व्यापक आणि शास्त्रशुद्ध ग्राउंड सर्व्हे सुरू करणार आहे.. या सर्व्हेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातील राजकीय परिस्थिती, जनतेचा कल, सरकारच्या योजनांचा तळागाळातील प्रभाव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेमकी ताकद काय आहे, याचा अचूक आणि सविस्तर अहवाल थेट सुनेत्रा पवार यांना सादर केला जाणार असल्याची माहिती आहे… या संपूर्ण बैठकीला सुनेत्रा पवार यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र आणि खासदार पार्थ पवार हे प्रत्यक्ष उपस्थित होते, तर त्यांचे दुसरे सुपुत्र जय पवार यांनी या बैठकीत ऑनलाइन माध्यमातून सहभाग घेतला होता, अशी सुत्रांची माहिती आहे… त्यामुळे पवार कुटुंबाने भविष्यातील राजकारणासाठी प्रशांत किशोर यांच्यावर मोठा विश्वास टाकल्याचे दिसून येत आहे…
मात्र, सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्यातील या 6 तासांच्या दीर्घ बैठकीमुळे सत्ताधारी महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपमध्ये तीव्र अस्वस्थता आणि नाराजी पसरल भाजपच्या या नाराजीमागे अत्यंत ठोस राजकीय कारणे आहेत. प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ पक्षाने नुकतीच बिहारमध्ये झालेली बांकीपूर विधानसभा पोटनिवडणूक जिंकून भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेली ही जागा भाजपचा अभेद्य बालेकिल्ला मानली जात होती. अशा सुरक्षित जागेवर प्रशांत किशोर यांच्या उमेदवाराने भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा तब्बल १९,३२४ मतांच्या फरकाने दारूण पराभव केला. बिहारमध्ये भाजपला थेट पराभवाची धूळ चारणाऱ्या नेत्याला महाराष्ट्रात आपलाच मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीने पायघड्या घालाव्यात आणि थेट ६ तास चर्चा करून रणनीती बनवण्याचे काम द्यावे, ही गोष्ट भाजप नेत्यांच्या पचनी पडलेली नाही









