Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • मराठमोळ्या ऋतुराजची दमदार खेळी; चेन्नईविरुद्ध मुंबईचा दारुण पराभव, स्पर्धेतील आव्हान संपलं!
क्रीडा

मराठमोळ्या ऋतुराजची दमदार खेळी; चेन्नईविरुद्ध मुंबईचा दारुण पराभव, स्पर्धेतील आव्हान संपलं!

मराठमोळ्या ऋतुराजची दमदार खेळी; चेन्नईविरुद्ध मुंबईचा दारुण पराभव, स्पर्धेतील आव्हान संपलं!

चेन्नई CSK Beat MI : पाच वेळचे चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स आयपीएल 2026 मध्ये आमनेसामने आले. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. आयपीएल 2026 मधील मुंबईचा हा सातवा पराभव होता. यजमान चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला आठ गडी राखून पराभूत करत या हंगामातील आपला चौथा विजय नोंदवला. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि कार्तिक शर्मा हे चेन्नईच्या या प्रभावी विजयाचे नायक ठरले. दोन्ही फलंदाजांनी अर्धशतकं झळकावली आणि ते नाबाद राहिले. विशेष म्हणजे आयपीएल 2026 च्या साखळी सामन्यात मुंबईला चेन्नईविरुद्ध दोन्ही वेळा पराभवाला सामोरं जावं लागले. आयपीएलच्या इतिहासात असं तिसऱ्यांदा घडलं आहे की, मुंबई इंडियन्सनं एकाच हंगामात चेन्नईविरुद्धचे दोन्ही साखळी सामने गमावले आहेत.

हेही वाचा : नसरापूर प्रकरणी चिमुकलीचा मृतदेह रस्त्यावर ठेवून नवले पुलावर ठिय्या; सुनेत्रा

मुंबईची फलंदाजी ढासाळली :

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सनं निर्धारित 20 षटकांत सात गडी गमावून 159 धावा केल्या. मुंबई इंडियन्ससाठी नमन धीरनं शानदार अर्धशतक झळकावत 57 धावा करुन डावाला आघाडी मिळवून दिली. त्यानं 37 चेंडूंमध्ये चार चौकार आणि तीन षटकार मारले. दरम्यान, रायन रिकल्टननं 37 धावांची खेळी केली. चेन्नई सुपर किंग्सकडून अंशुल कंबोजनं तीन बळी घेतले, तर नूर अहमदनं दोन बळी घेतले.

चेन्नईचा आरामात विजय :

मुंबईच्या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना, कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या शानदार अर्धशतकामुळं चेन्नई सुपर किंग्सनं 19 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर 160 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं. ऋतुराजनं 48 चेंडूंमध्ये 67 धावांची खेळी केली आणि तो नाबाद राहिला. कार्तिक शर्मानंही 39 चेंडूंमध्ये शानदार अर्धशतक झळकावलं. कार्तिक आणि गायकवाडनं 78 चेंडूंमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी केली. कार्तिकनं चौकार मारुन चेन्नईला विजय मिळवून दिला. त्यानं 40 चेंडूंमध्ये चार चौकार आणि तीन षटकारांसह 54 धावांची नाबाद खेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts