Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • 163 धावा काढतांना गुजरातला नाकीनऊ, शेवटच्या षटकात मिळाला विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव
क्रीडा

163 धावा काढतांना गुजरातला नाकीनऊ, शेवटच्या षटकात मिळाला विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव

163 धावा काढतांना गुजरातला नाकीनऊ, शेवटच्या षटकात मिळाला विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव

अहमदाबाद GT Beat PBKS : आयपीएल 2026 मध्ये पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला, ज्यात गुजरातनं शेवटच्या षटकात 4 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात पंजाबनं केवळ 163 धावा केल्या असल्या तरी, गुजरातला विजय मिळवण्यासाठी शेवटच्या षटकापर्यंत कडवी झुंज द्यावी लागली. शेवटच्या षटकात 11 धावांची गरज असताना, वॉशिंग्टन सुंदरनं मार्कस स्टोइनिसच्या पाचव्या चेंडूवर षटकार मारून सामना निश्चित केला.

हेही वाचा : केकेआरनं थांबवला हैदराबादचा विजयरथ; दणदणीत विजय मिळवत संघ प्लेऑफच्या शर्यतीत

गुजरातनं शेवटच्या षटकात जिंकला सामना :

गुजरातसाठी डावाची सुरुवात करणाऱ्या साई सुदर्शननं 41 चेंडूंमध्ये 57 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 40 धावांनी त्याच्या संघाचा विजय निश्चित केला. जोस बटलर (26) आणि निशांत सिद्धू (15) यांनीही योगदान दिलं. पंजाबकडून अर्शदीप सिंग आणि विजयकुमार वैशाख यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

पंजाबचं टॉप ऑर्डर अपयशी :

यापूर्वी, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सची सुरुवात खूपच खराब झाली. 47 धावांवर निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला. असं असूनही, पंजाब किंग्सनं 20 षटकांत 9 गडी गमावून धावफलकावर 163 धावा केल्या. पंजाबकडून सूर्यांश शेडगेनं 29 चेंडूंमध्ये 57 धावांची शानदार खेळी केली. त्याने आपल्या वादळी खेळीत 3 चौकार आणि 5 षटकार मारले. मार्कस स्टोइनिसनेही 40 धावांचे योगदान दिले. गुजरातकडून जेसन होल्डरनं सर्वाधिक 4 बळी घेतले. मोहम्मद सिराज आणि कागिसो रबाडा यांना प्रत्येकी 2 बळी मिळाले.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts