Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • पुदुचेरीत मुख्यमंत्री एन. रंगस्वामी यांचा विजय; एनडीए आघाडीचा विजयही निश्चित
ताज्या बातम्या

पुदुचेरीत मुख्यमंत्री एन. रंगस्वामी यांचा विजय; एनडीए आघाडीचा विजयही निश्चित

पुदुचेरीत मुख्यमंत्री एन. रंगस्वामी यांचा विजय; एनडीए आघाडीचा विजय निश्चित

पुदुचेरी CM N Rangasamy Win : पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (४ मे) जाहीर होत आहे. पुदुचेरीमधील सहा मतदान केंद्रांवर मतमोजणी सुरु आहे. मुख्यमंत्री एन. रंगस्वामी यांनी थट्टानचावडी जागा जिंकली आहे. तर भारतीय जनता पक्षाने मन्नाडीपेट विधानसभा जागा जिंकली आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार एआयएनआरसी आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी 16 जागांवर पुढं असून बहुमतांपेक्षा जास्त आहे. पुदुचेरीत पुन्हा एकदा एन. रंगस्वामी यांच्या नेतृत्वात एनडीए आघाडीचा विजय निश्चित मानला जातोय.

हेही वाचा : केरलममध्ये काँग्रेसचा विजयन यांच्या सत्तेला सुरंग; देशातून पूर्णपणे डाव्यांचा सफाया

पुदुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगस्वामी विजयी :

डीएमकेनंही नेल्लिथोप जागाही जिंकली आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, पुदुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगस्वामी यांनी थट्टानचावडी विधानसभा जागा 4441 मतांनी जिंकली आहे. भाजपाचे उमेदवार ए. नमासिवयम् यांनी मन्नाडीपेट विधानसभा जागा 6110 मतांनी जिंकली आहे. डीएमकेचे उमेदवार व्ही. कार्तिगुयेन यांनी नेल्लिथोप जागा 850 मतांनी जिंकली आहे.

काँग्रेसचे (एआयएनआरसी) उमेदवार आघाडीवर :

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, ऑल इंडिया एन.आर. काँग्रेसचे (एआयएनआरसी) उमेदवार आर. रविकुमार, वैयपुरी मणिकंदन, सी. अय्यप्पन, ई. मोहनदास, पी. राजवेलू आणि पी.आर.एन. थिरुमुरुगन हे अनुक्रमे विल्लियानूर, मुथियालपेट, अरियानकुप्पम, अनबलम, नेट्टापक्कम आणि कराईकल नॉर्थ या मतदारसंघांमध्ये आघाडीवर होते. भाजपाचे उमेदवार ए. नमस्सिवयम् आणि टी.के.एस.एम. मीनाक्षीसुंदरम हे मन्नाडीपेट आणि नेरावी टी.आर. पट्टिनम या मतदारसंघांमध्ये आघाडीवर होते.

पुदुचेरीमधील निवडणुकीचे मुद्दे :

एनडीए आघाडी पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणूक विकास प्रकल्प, पर्यटन आणि केंद्र सरकारच्या योजनांचं आश्वासन देऊन लढवत आहे. याउलट, काँग्रेस+डीएमके आघाडी बेरोजगारी, महागाई आणि स्थानिक मुद्द्यांवर प्रचार करत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts