Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
Top News

”शिवाजी भी हमारे….” काँग्रेसच्या नेत्याद्वारे वादग्रस्त वक्तव्य

Chhatrapati Shivaji Maharaj

Chhatrapati Shivaji Maharaj : अकोला येथे झालेल्या  सभेत काँग्रेसच्या एका नेत्याने केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी करण्यात आलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले असून, विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष म्हणजे, यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्या असल्याने   संतापाची लाट उसळली आहे.

काँग्रेसचे नेते आझाद खान यांनी सभेत बोलताना “औरंगजेब भी हमारे और शिवाजी भी हमारे” असे विधान केले. या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्येच खळबळ उडाली. शिवप्रेमींनी तसेच भाजप नगरसेवकांनी या विधानाचा तीव्र निषेध नोंदवत, संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे अकोल्यासह राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघण्याची चिन्हे दिसत आहेत. सोशल मीडियावरही या वक्तव्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी भाषेत केल्या असल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

गेल्या काही महिन्यांत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यातील वातावरण आधीच संवेदनशील बनले आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि भिक्खू ज्ञानज्योती यांच्या विधानांनंतर आता आझाद खान यांच्या वक्तव्याने नव्या वादाला खतपाणी मिळाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष यावर काय भूमिका घेणार आणि संबंधित नेत्यावर कारवाई होणार का?  याकडे संपूर्ण  लक्ष लागले आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts