Stock Market Crash Today : भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा एकदा मोठी पडझड पाहायला मिळाली. सलग चौथ्या दिवशी बाजार कोसळल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढते कच्च्या तेलाचे दर, परदेशी गुंतवणूकदारांची विक्री, डॉलरच्या तुलनेत घसरत चाललेला रुपया आणि जागतिक तणाव यामुळे बाजारावर मोठा दबाव आला आहे. दुपारपर्यंत सेन्सेक्स तब्बल १ हजार अंकांनी घसरला, तर निफ्टीतही जवळपास ३०० अंकांची घसरण झाली. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे काही दिवसांतच लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेअर बाजारातील या मोठ्या घसरणीने सर्वसामान्य गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.दुपारपर्यंत सेन्सेक्स तब्बल १ हजार अंकांनी घसरला, तर निफ्टीतही जवळपास ३०० अंकांची घसरण झाली. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे काही दिवसांतच लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेअर बाजारातील या मोठ्या घसरणीने सर्वसामान्य गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.तज्ज्ञांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच इंधन वापर कमी करण्याचे आणि काही काळ सोने खरेदी टाळण्याचे केलेले आवाहनही बाजारासाठी नकारात्मक संकेत मानले जात आहेत. जागतिक आर्थिक संकट आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क असल्याचे या वक्तव्यातून दिसून येत असल्याने गुंतवणूकदार सावध झाले आहेत.
बाजार घसरण्यामागील प्रमुख कारणे
१) पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा परिणाम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर इंधन वापर कमी करण्याचे आणि वर्षभर सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले. या वक्तव्यानंतर महागाई आणि आर्थिक संकट आणखी वाढू शकते, अशी भीती गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाली.
२) कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ
ब्रेंट क्रूडचे दर सलग दोन महिन्यांपासून १०० डॉलर प्रति बॅरलच्या वर आहेत. त्यामुळे भारताच्या आयात खर्चात वाढ होत असून महागाई आणि रुपयावर दबाव वाढत आहे.
३) रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर
भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत आणखी ३५ पैशांनी घसरून ९५.६३ या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला.
४) परदेशी गुंतवणूकदारांची विक्री सुरूच
एफपीआय गुंतवणूकदारांनी जुलैपासून भारतीय बाजारातून सुमारे ४.५ लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत.
५) जागतिक तणावामुळे अस्थिरता
अमेरिका-इराण तणावामुळे जागतिक बाजारात अस्थिरता वाढली असून तेलाच्या किंमती उच्च पातळीवर कायम आहेत.
६) अमेरिकन बाँड उत्पन्नात वाढ
अमेरिकेतील बाँड यिल्ड वाढल्याने गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत. त्यामुळे भारतासारख्या उदयोन्मुख बाजारांवर दबाव वाढला आहे.
विशेषज्ञांच्या मते, जागतिक परिस्थितीत सुधारणा होत नाही तोपर्यंत शेअर बाजारातील चढ-उतार कायम राहू शकतात. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाबरून निर्णय न घेता सावधगिरीने गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.












