Married woman assaulted : एका विवाहितेवर अत्याचार (Married woman assaulted) केला तो केला वरून नराधमानं पीडितेच्या पतीला काय धमकी दिली… जा, तुला काय करायचं ते कर!’ या नराधमात एवढी मस्ती आणि माज आला कुठून? अत्याचारासारखा गंभीर गुन्हा करूनही धमकी देण्याची भाषा (Threatening language) या नराधमाच्या तोंडी येते कुठून? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बीड (Beed Crime News) जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील एका गावात नुकतीच ही धक्कादायक घटना घडली. पीडितेनं 7 मे रोजी दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी विरूद्ध केज पोलिस ठाण्यात अत्याचार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा (Offense under the Atrocities Act) अखेर दाखल झाला.
हेही – इन्स्टा प्रेम! बांगलादेशातून मुलगी जळगावात, पोलिसांची एन्ट्री अन् हाती बेड्या
मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील एका गावात एका 30 वर्षीय पीडित विवाहित महिलेच्या कुटुंबानं बटईनं शेती केली असून हे कुटुंब ऊसाचं पीक घेतं. या विवाहितेचे सासरे आजारी असल्यानं त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. त्यामुळं आजारी सासऱ्याच्या देखभालीसाठी या महिलेचा पती आणि सासू रुग्णालयात थांबून होते. 21 एप्रिल रोजी ही महिला उसाच्या पिकाला एकटीच पाणी देत असल्याची संधी साधून जाधवजवळा येथील रहिवासी आसाराम रंगनाथ जाधव हा इसम त्या महिलेजवळ गेला आणि काय करत आहेस, असं म्हणत तिच्या हाताला धरून ओढत ओढत उसाच्या पिकात नेलं.
बळजबरीनं त्या विवाहित महिलेवर अत्याचार
त्याचं हे कृत्य पाहून महिलेनं आरडाओरडा सुरू केला. मात्र जवळपास कुणी नसल्यानं तिला मदत मिळू शकली नाही. त्यानंतर आरोपी आसाराम जाधव यानं,’ तू मला आवडतेस, असं म्हणत बळजबरीनं त्या विवाहित महिलेवर अत्याचार केला. इतकंच नव्हे, तर हा प्रकार कुणाला सांगितल्यास तुला जिवे मारून टाकीन, अशी धमकीही दिली. भीतीपोटी ती महिला बिचारी काही दिवस गप्प राहिली. एवढा मोठा गंभीर गुन्हा करूनही आपलं कुणी वाकड करू शकत नाही, आपल्याविरोधात पोलिसात तक्रार होत नाही म्हटल्यावर त्या नराधमाचा माज आणखी वाढला.
बलात्कार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
आरोपी आसाराम जाधवनं त्या पीडित महिलेच्या घरासमोरून गाडी नेत हॉर्न वाजवून तिला डिवचलं. अखेर या महिलेनं 21 एप्रिल रोजी तिच्यासोबत घडलेला प्रकार पतीला सांगितला. पतीला हा प्रकार समजताच त्यानं आरोपीला याबाबत जाब विचारला असता ‘तुला काय करायचं ते कर, असं म्हणत त्याला जातीवाचक शिवीगाळ केली. अखेर पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून आसाराम रंगनाथ जाधव याच्याविरुद्ध केज पोलिस ठाण्यात बलात्कार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस अधीक्षक वेंकटराम या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
एकूणच काय, तर अत्याचारासारखा गंभीर गुन्हा करून वर पीडितेच्या पतीला तुला काय करायचं ते कर, अशी धमकी देऊन माझं कुणी वाकडं करू शकत नाही, असा माज आलेल्या या नराधमांना चाबकानं फोडून काढलं पाहिजे, एकट्या-दुकट्या असहाय महिलांना गाठून त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या अशा नराधमांची गावातून धिंड काढली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं.












