• Home
  • महाराष्ट्र
  • मोठी बातमी! नसरापूर प्रकरणात क्रूर कृत्यादरम्यान ४ ते ५ मुलांचा थांबवण्याचा प्रयत्न; आरोपीने दगड भिरकावला, नेमकं काय घडलं?
गुन्हा

मोठी बातमी! नसरापूर प्रकरणात क्रूर कृत्यादरम्यान ४ ते ५ मुलांचा थांबवण्याचा प्रयत्न; आरोपीने दगड भिरकावला, नेमकं काय घडलं?

Nasarapur Crime

Pune Nasarapur Crime: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेचा तपास अधिक वेगाने पुढे सरकत आहे. साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि तिच्या मृत्यूच्या प्रकरणात आता तपास यंत्रणांच्या हाती महत्वाचे पुरावे लागल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या तपासात घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज महत्वाचा पुरावा ठरत आहे. या फुटेजमध्ये आरोपीने गुन्हा करताना ४ ते ५ लहान मुलांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत असल्याची माहिती आहे. त्या वेळी आरोपीने मुलांच्या दिशेने दगड फेकून त्यांना दूर लोटल्याचा प्रकारही समोर आल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडीओ पोलिसांनी जप्त केला असून तो तपासासाठी निर्णायक ठरू शकतो.

घटनास्थळी उपस्थित

तसेच, घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही मुलांचे जबाब ई-साक्ष स्वरूपात नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे तपासाला अधिक बळ मिळत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

ऑनलाईन पद्धतीने न्यायालयात हजर

दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने पुन्हा पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला ऑनलाईन पद्धतीने न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नांना आरोपीने संक्षिप्त उत्तरे दिल्याची माहिती आहे.

या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रकरणाचा जलदगतीने निकाल लागावा यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात आली असून सरकारकडून विशेष न्यायालय स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांकडून तपास अधिक गतीने सुरू असून उपलब्ध पुरावे आणि साक्षींच्या आधारे प्रकरणातील सत्य समोर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts