Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • मुंबईकरांनो आता खर्च करा जपून; CNG दरात पुन्हा वाढ, खिशाला बसणार कात्री, जाणून घ्या नवीन दर
Mumbai

मुंबईकरांनो आता खर्च करा जपून; CNG दरात पुन्हा वाढ, खिशाला बसणार कात्री, जाणून घ्या नवीन दर

Mumbai CNG Price Hike | मुंबईकरांना (Mumbai) खर्च आता जपून करावा लागणार आहे कारण आता त्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. मुंबईमध्ये अचानक सीएनजीच्या (CNG) दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जे वाहनचालक गॅसवर अवलंबून आहेत त्यांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. सीएनजीच्या दरात अचानक झालेल्या वाढीमुळे (CNG Price Hike) आता सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे.

हेही वाचा – दिल्ली पुन्हा हादरली! बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

काय आहेत सीएनजीचे नवीन दर?

आत्तापर्यंत सीएनजीचा दर हा 82 रूपये प्रति किलोग्राम होता. मात्र, आता महानगर गॅस लिमिटेडने (MGL) सीएनजीच्या दरात 2 रूपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता नवीन दर 84 रूपये प्रति किलोग्राम झाला आहे. सीएनजीचे हे नवीन दर मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासह अनेक भागांमध्ये लागू करण्यात आले आहेत.

सीएनजीचे नवीन दर कोणत्या भागांमध्ये होणार लागू?

एमजीएलने दिलेल्या माहितीनुसार, सीएनजीचे हे वाढीलेले दर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भयंदर आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) लागू होणार आहेत. त्यामुळे आता लाखो वाहन मालकांना थेट आर्थिक बोजा सहन करावा लागेल. पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून सीएनजीचा वापर सुरू केलेल्या हजारो वाहनचालकांना या अचानक झालेल्या दरवाढीने मोठा धक्का बसला आहे.

सीएनडीच्या दरात वाढ करण्याचे कारण महानगर गॅस लिमिटेडने सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय गॅस दरांमध्ये चढउतार होत असल्यामुळे गॅसच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली असल्याची माहिती महानगर गॅस लिमिटेडने दिली आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये सीएनजीच्या दरात वाढ करण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा फटका सहन कराना लागत आहे. कारण मुंबईतील टॅक्सी आणि ऑटो-रिक्षा पूर्णपणे सीएनजीवर अवलंबून आहेत. अशातच आता गॅसचे दर वाढल्याने टॅक्सी, रिक्षाचे भाडेही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागणार आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts