Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • पुण्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये टायमर बॉम्ब असल्याच्या माहितीने खळबळ
Top News

पुण्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये टायमर बॉम्ब असल्याच्या माहितीने खळबळ

Pune hospital bomb threat alert
64

Pune hospital bomb threat alert : पुण्यातून एक धक्कादायक आणि सुरक्षेच्या दृष्टीने जिंताजनक बातमी समोर आली आहे. हडपसर (Pune Crime News) परिसरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या उषाकिरण हॉस्पिटलमध्ये (Ushakiran Hospital) बाथरूममध्ये टायमर बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पुणे पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथक आणि नाशक पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयास्पद वस्तू सुरक्षितरीत्या ताब्यात घेऊन मोकळ्या मैदानात नष्ट केली. त्यामुळे संभाव्य धोका टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास उषाकिरण हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरील बाथरूममधील बेसिनखाली ही संशयास्पद वस्तू ठेवण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती इलेक्ट्रिक दुचाकीवरून येऊन बाथरूममध्ये ही वस्तू ठेवताना दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना समजताच रुग्णालयात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.

हेही वाचा – दिल्ली पुन्हा हादरली! बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

महिला कर्मचाऱ्यांना ही वस्तू आढळली

दरम्यान, बाथरूममध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना ही वस्तू आढळल्यानंतर त्यांनी तात्काळ डॉक्टर विलास गायकवाड यांना माहिती दिली. डॉक्टरांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, त्या वस्तूला चार जिलेटिन कांड्या, घड्याळाच्या स्वरूपातील टायमर आणि वायर जोडलेली असल्याचे दिसून आले. टायमरवर 7.21 अशी वेळ दिसत होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत डॉक्टर गायकवाड यांनी हॉस्पिटलमधील रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून धाडस दाखवत ती वस्तू स्वतः हाताने उचलून एका बॉक्समध्ये ठेवली आणि हॉस्पिटलसमोरील मोकळ्या जागेत हलवली. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

आयुक्त अमितेश कुमार यांनी घटनास्थळी भेट

माहिती मिळताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, तसेच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी बॉम्ब सूट परिधान करून संशयास्पद वस्तू ताब्यात घेतली आणि ग्लायडिंग सेंटरच्या आवारातील मोकळ्या मैदानात नेऊन नियंत्रित पद्धतीने नष्ट केली. या घटनेनंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित व्यक्तीचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts