Best Oil For Hair Care | आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे बऱ्याच लोकांना केसांच्या अनेक समस्या जाणवताना दिसतात. यामध्ये केस गळीत असो, केसात कोंडा होणे असो किंवा केस पातळ होणे असो अशा अनेक समस्या निर्माण होताना दिसतात. मग जेव्हा केसांची काळजी घेण्याची वेळ येते तेव्हा नारळाचे तेल (Coconut Oil) आणि बदामाचे तेल (Almond Oil) वापरण्याचा सल्ला दिला जातो. कारण या तेलांचा वापर शतकानुशतके केला जात आहे. पण बऱ्याचजणांना असा प्रश्न पडतो की केसांसाठी कोणतं तेल सर्वोत्तम आहे नारळाचं की बदामाचं? जर तुम्हालासुद्धा असा प्रश्न पडला असेल तर आपण आता याबाबत जाणून घेऊया.
कोणतं तेल आहे केसांसाठी फायदेशीर?
नारळाचे तेल हे केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. नारळाच्या तेलामुळे आपले केस मजबूत होतात आणि केसाच्या समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामुळे बरेच लोक नारळाचे तेल मोठ्या प्रमाणाच वापरताना दिसतात. इतर तेलांच्या तुलनेत नारळाचे तेल हे केसांना आर्द्रता देते. तसेच संशोधनातून असे दिसून आले आहे की, नारळाचे तेल केसांमधील प्रथिनांचे नुकसान कमी करते ज्यामुळे केस मजबूत होतात आणि तुटण्याचे प्रमाण कमी होते. त्यात बुरशीविरोधी आणि जिवाणूविरोधी गुणधर्म देखील आहेत, जे कोंडा दूर ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे नारळाचे तेल आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरते.
आता प्रश्न राहिला तो बदामाच्या तेलाचा. बदामाचे तेल देखील आपल्या केसांसाठी उपयुक्त ठरते. हे तेल ओमेगा-3 फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियमने समृद्ध असते. व्हिटॅमिन ई एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे जे केसांचे सूर्यप्रकाश आणि प्रदूषणापासून संरक्षण करते. ते केसांची लवचिकता सुधारते, ज्यामुळे कंगवा करताना केस तुटण्याचे प्रमाण कमी होते. बदामाचे तेल एक उत्कृष्ट मॉइश्चरायझर आहे. ते आपले केस चमकदार करण्यास मदत करते.
जर तुम्ही केसांच्या वाढीसाठी उपाय शोधत असाल, तर खोबरेल तेल हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. ते केसांच्या मुळांना मजबूत करते आणि केस तुटण्यापासून वाचवते. जेव्हा केस तुटणे कमी होते, तेव्हा ते अधिक लांब दिसतात. तसेच जर तुमचे केस खूप पातळ असतील आणि खोबरेल तेलामुळे ते चिकट होत असतील तर बदामाचे तेल हा एक चांगला पर्याय आहे. ते हलके असते आणि केसांना चिकट न करता त्यांचे पोषण करते. त्यामुळे आता तुम्ही तुमच्या केसांच्या समस्येनुसार ठरवा कोणतं तेल वापरायचं. कारण दोन्ही तेल आपल्या केसांसाठी फायदेशीर आहेत.












